40 टक्के सवलत दिल्याबद्दल आभार, पण तीनपट टॅक्स आकारणी एकपट करण्याचे आश्वासन हवेत | दिपाली धुमाळ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलत देणार व तीनपट टॅक्स आकारणी एकपट करणार असे जाहीर केले होते. मात्र तीनपट बाबतचे आश्वासन हवेतच विरले आहे. अशी आलोचना राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
धुमाळ यांच्यानुसार मंत्री मंडळाने निर्णय घेताना 40 टक्के सवलत बाबत निर्णय घेण्यात आला असून तीनपट टॅक्स आकारणी बाबत निर्णय झालेला नाही. समाविष्ट गावातील व्यवसाय धारक, छोटे छोटे दुकान धारक यांना तीनपट टॅक्स आकारणी केली असून ती अन्यायकारक आहे असे त्यांचे म्हणणे होते विधानसभेत यावर चर्चा देखील झाली होती. असे असताना छोट्या व्यवसाय धारकांवर अन्याय होत आहे. तरी, तीनपट टॅक्स बाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. असे धुमाळ यांनी सांगितले.