पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा
| कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पुणे | पुणे शहरात मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. सदर पावसाने पुणेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शहरात स्मार्ट सिटी,रस्ते,ड्रेनेज व इतर खात्यांची कामे करणारे ठेकेदार योग्य कामे करत नाहीत. तसेच काही ठेकेदार फक्त बिल घेतात आणि काम करत नाहीत. तर काही ठेकेदार पावसाळी,ड्रेनेज लाईन बुजवण्याचे काम करत आहे. तथापि याबाबत कारवाई झाली असती तर अशी वेळ पुणेकरांवर आली नसती. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
बालगुडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरात मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. सदर पावसाने पुणेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांची घरे काही प्रमाणात वाहून गेले आहेत. तर अनेकांच्या झोपड्यांमध्ये व सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. हजारो नागरिकांची वाहनांची व घरातल्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच पुण्याच्या रस्त्यांना नदी नाल्यांचे स्वरूप आले होते. यापूर्वीसुद्धा पुण्यात मुसळधार वृष्टी व्हायची परंतु काही तुरळक घटना सोडल्या तर शहराला खूप त्रास होत नव्हता. परंतु मागील तीन वर्षात हा प्रकार वाढत गेला आहे. विशेषता या वर्षात पावसाळी पाण्याचे नियोजन न केल्याने व ठेकेदारांनी रस्त्याची,नाल्यांची,गटारांची कामे योग्य पद्धतीने न केल्याने हा प्रकार वाढला आहे. पावसाच्या पाण्याला वाहून जायला वाटणं निघाल्याने पाणी रस्त्यावर झोपड्यांमध्ये सोसायट्यांमध्ये पार्किंगमध्ये पेठाण मधील तळ घरात राहत असलेल्या घरांमध्ये शिरत आहे. संपूर्ण पुणे शहरात हजारो नागरिक बाधित झाले आहेत, व पुणेकरांचे किमान कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बालगुडे म्हणाले, आम्ही प्रदेश काँग्रेसच्या वतीने व वैयक्तिक पुणेकर नागरिक म्हणून आपल्याला फेब्रुवारी महिन्यात निवेदन देऊन याची संपूर्ण कल्पना दिली होती. शहरात स्मार्ट सिटी,रस्ते,ड्रेनेज व इतर खात्यांची कामे करणारे ठेकेदार योग्य कामे करत नाहीत. तसेच काही ठेकेदार फक्त बिल घेतात आणि काम करत नाहीत. तर काही ठेकेदार पावसाळी,ड्रेनेज लाईन बुजवण्याचे काम करत आहे.तथापि याबाबत कारवाई झाली असती तर अशी वेळ पुणेकरांवर आली नसती. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची जबाबदारी निश्चित करावी ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांबरोबर संगनमत केले आहे. अशा त्वरित कारवाई करावी व ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.असे ही बालगुडे म्हणाले.