Pune : NCP Vs BJP : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात प्रतीकात्मक होळी

HomeपुणेBreaking News

Pune : NCP Vs BJP : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात प्रतीकात्मक होळी

Ganesh Kumar Mule Mar 17, 2022 3:04 PM

Prashant Jagtap Vs BJP : सूर्यास्त होईपर्यंत स्थायी ची बैठक चालवली म्हणजे भाजपला आर्थिक विषयात किती रस?
OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?
Atal Shakti Mahasampark Abhiyan : देवेंद्र फडणवीस म्हणतात, पुणे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते!

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात प्रतीकात्मक होळी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा ई व्हेईकल घोटाळा, नदी सुधार घोटाळा ,१४ लाखांचे झाड, ॲमिनिटी स्पेस विक्री घोटाळा, ३२०० फ्लॅट विक्री घोटाळा,जलपर्णी घोटाळा, कॉफिटेबल बुक घोटाळा या विविध घोटाळ्यांच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी केली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की “आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य अन्याय अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळी च्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो व महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात कारभारी करणारी करणारी भाजप असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही ,अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अनिष्ट प्रवृत्तींचा आम्ही दहन करत आहोत”.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.