Swatantra Veer Savarkar | सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली

Homeadministrative

Swatantra Veer Savarkar | सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली

Ganesh Kumar Mule May 26, 2025 8:57 PM

Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम
Vishwa Marathi Sammelan 2025 | तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू
Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

Swatantra Veer Savarkar | सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली

 

Veer Savakar Jayanti – (The Karbhari News Service) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोली त्यांच्या जयंती निमित्त येत्या बुधवारी (28 मे) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी खुली राहणार आहे. (Fergusson College Pune)

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात 1902 ते 1905 या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकरांनी वास्तव्य केले होते. ते वसतिगृह क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 17 मध्ये राहत असत. ही खोली त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि उपक्रमांची साक्षीदार आहे.

या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे दोन गणवेश, त्यांच्या वापरातील वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या खोलीत सावरकरांनी अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारी उपक्रमांची योजना केली. त्यात विदेशी वस्त्रांची होळी, स्वदेशी चळवळीची सुरुवात आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना यांचा समावेश आहे. या खोलीतूनच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी काव्ये रचली.

1905 साली विदेशी वस्त्रांची होळी केल्याच्या घटनेनंतर, तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकले आणि दंड आकारला. या घटनेनंतर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात ‘हे आमचे गुरु नव्हे’ या शीर्षकाखाली लेख लिहून निषेध व्यक्त केला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन करून ठेवले आहे. सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ही खोली नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते. ही खोली सावरकरांच्या क्रांतिकारी प्रवासाची साक्ष देणारी असून, आजही ती प्रेरणास्थान म्हणून ओळखली जाते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: