स्वच्छ भारत मिशन : 17 व्या स्थानावरून पुणे पाचव्या स्थानावर
: पुणे महापालिकेचे प्रयत्न आले कामाला
पुणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत पुण्याने पुन्हा एकादा झेप घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर 17 व्या क्रमांकावर होते.
: 1 लाख लोकसंख्येत लोणावळा दुसऱ्या स्थानावर
दरम्यान, देशात पुन्हा एकदा इंदोर ने बाजी पटकावर स्वच्छ शहरात पहिला क्रमांक पटकावला असून दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा, चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई असून पाचव्या क्रमांकावर पुण्याने झेप घेतली आहे. 10 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या 48 प्रमुख शहरांचा या सर्वेक्षणात समावेश होता. महापालिकेच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार, घनकचरा विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तसेच १ लाखां पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांध्ये महाराष्ट्रातील लोणावळा शहराने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. तर १ लाखां पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांध्ये महाराष्ट्रातील सासवड शहराने देशात तिसरा क्रमांक पटकाविला.
—
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत आपल्या पुण्याने पुन्हा एकादा झेप घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर १७ व्या क्रमांकावर होते. सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक अभिनंदन !
मुरलीधर मोहोळ, महापौर.
—-
महापालिकेला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हे सांघिक यश आहे. महापालिकेचे स्थान अजून उंचावण्यासाठी आम्ही हिरीरीने प्रयत्न करू.
डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
—-
पुणे महापालिका आणि शहरातील सर्व संस्था यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नामुळे महापालिकेला हे स्थान मिळवता आले आहे. महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, घनकचरा विभागाची टीम, महापालिकेचे सर्वच पदाधिकारी यांनी साथ दिल्यामुळे हे शक्य झाले. आगामी काळात पुणे महापालिकेला पहिला नंबर कसा मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल.
COMMENTS