सुरेखा भणगे यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी
पुणे | माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना नुकतेच महापालिका (PMC Pune) सेवेत प्रतिनियुक्तीने (Deputation) नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची (Dhankawadi-sahkarnagar ward office) जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
सुरेखा भणगे यांना महापालिका सहायक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने रुजू करून घेण्यात आले आहे. शासनाच्या सेवेत त्या याआधी माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी होत्या. महापालिका सेवेत आल्यानंतर त्यांच्याकडे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) शिरीष भांगरे यांच्याकडील अतिरिक्त पदभार संपुष्टात आणण्यात आला आहे. (pune municipal corportion)
| सोशल मीडिया कक्षाची जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे
पुणे महापालिकेत माहिती आणि तंत्रज्ञान विभागा मार्फत 2015 पासून सोशल मीडिया कक्ष (social media cell) स्थापन करण्यात आला आहे. यावर याच विभागाचे नियंत्रण आहे. असे असताना काही दिवसापासून या कक्षाची जबाबदारी प्रतिनियुक्तीने आलेल्या उपायुक्त यांच्यावर सोपवली जात आहे. नुकतीच या कक्षाची जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे (Deputy commissioner chetna kerure) यांच्याकडे देण्यात आली आहे. याआधी ती जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे होती. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान या कक्षावर माहिती तंत्रज्ञान विभागाचे जर नियंत्रण आहे आणि तोच विभाग याचे सगळे काम करत असेल तर इतर अधिकाऱ्यांना याची जबाबदारी का दिली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.