Sunil Shinde : असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड

Homeपुणेsocial

Sunil Shinde : असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड

Ganesh Kumar Mule Mar 23, 2022 2:14 PM

 Sonia And Rahul Gandhi | सोनिया व राहुल गांधीवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीनेच – अरविंद शिंदे
Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन
Congress : PM Modi in Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश : कॉंग्रेसचा दावा

असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड

पुणे:- काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी श्री शिंदे यांची निवड झाल्याचे कळविले आहे.

सुनील शिंदे हे गेली पंचवीस वर्षे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या पूर्वी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाचे संचालक म्हणूनही काम केले आहे. सध्या पुणे जिल्हा माथाडी मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. कामगार क्षेत्रातील कार्य संदर्भात  शिंदे यांना विविध देशांमध्ये कामगार प्रश्नांवर बोलण्यासाठी ही यापूर्वी संधी मिळाली आहे. पुण्यातील कामगार नेत्याला काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल येथील कामगारांनी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार व्यक्त केले व आनंदही व्यक्त केला आहे. असंघटित कामगारांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होईल असे शिंदे यांनी सांगितले व ही मोठी संधी दिल्याबद्दल श्रीमती सोनिया गांधी व असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदित राज यांचेही आभार व्यक्त केले आहेत.