Suhas Diwase IAS | Dr Rajesh Deshmukh IAS | सुहास दिवसे पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी | डॉ राजेश देशमुख यांची बदली
Suhas Diwase IAS | Dr Rajesh Deshmukh IAS | पुणे | पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी (Pune Collector) पदी राज्य सरकारकडून सुहास दिवसे (Suhas Diwase IAS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांची बदली करण्यात आली असून त्यांना पुण्यातच क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदी नियुक्त करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नुकतेच विभागीय आयुक्तांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. सुहास दिवसे हे पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी असतील. दिवसे हे क्रीडा व युवक सेवा आयुक्त होते. त्यांच्या जागी आता डॉ देशमुख काम पाहतील.