Sugar factory Employees | साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक

या बैठकीला कामगार नेते व आमदार भाई जगताप, कामगार नेते सुनील शिंदे, अविनाश अधिक, राजेंद्र होनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते उपस्थित होते.

HomeBreaking News

Sugar factory Employees | साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक

Ganesh Kumar Mule Aug 07, 2024 8:30 PM

Sharad Pawar | श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरासाठी जागा आणि भिडे वाड्यात जागतिक दर्जाची शाळा
Dilip walse patil : सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
Police Recruitment : राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती

Sugar factory Employees | साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक

 

 

Dilip Walse Patil – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीला कामगार नेते व आमदार भाई जगताप, कामगार नेते सुनील शिंदे, अविनाश अधिक, राजेंद्र होनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते उपस्थित होते. (Maharashtra News)

 

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त डॉ H P तुमोड व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये साखर कामगारांच्या वेतन वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तात्काळ गठीत करून वेतन वाढीचा करार पूर्ण करावा, त्याचबरोबर राज्यातील साखर कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे, ज्या साखर कारखान्यांनी त्रिपक्षीय समितीने केलेला करार व त्याप्रमाणे वेतन वाढ दिलेली नाही, अशा कारखानदारांना क्रशिंगचे लायसन देऊ नये, काही कारखान्यांनी कामगारांची देणे देण्यासाठी सरकारकडून त्याबरोबर काही बँकांकडून कर्ज घेतले आहे परंतु कामगारांची तिकीट देणे दिलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीच्या मागण्या करण्यात आल्या. त्यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती घटित करण्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0