बिबवेवाडी परिसरातील हिलटॉप हिलस्लोप मधील अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई
: महापालिका प्रशासनाची माहिती
पुणे : बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम कात्रज चौक येथील आणि श्रीजी लॉन्स नजीक स.नं. 655,656 येथील 16 अनधिकृत बांधकामावर महापालिका प्रशासनाच्या वतीने आज कारवाई करण्यात आली. परिसरातील हिलटॉप हिलस्लोप मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उमेश शिद्रुक यांनी दिली.
शिद्रुक यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबवेवाडीतील श्रीजी लॉन्स जवळील हिलटॉप हिलस्लोप मध्ये अनधिकृतपणे व्यापारी संकुले बांधण्यात आली होती. त्यामुळे कायद्यानुसार नोटिसा देऊन ही कारवाई करण्यात आली. या कारवाई साठी 4 जेसीबी, 1 गॅस कटर, 1 ब्रेकर, 1 गट पोलीस आणि 1 गट अतिक्रमण विभागाचे बिगारी यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 40 हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. शिद्रुक यांनी सांगितले कि व्यापारी संकुलावर दर आठवड्यात कारवाई करण्यात येणार आहे.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आणि अधीक्षक अभियंता सुधीर कदम, कार्यकारी अभियंता हर्षदा शिंदे, उपअभियंता चंद्रसेन नागटिळक, शाखा अभियंता उमेश शिद्रुक, श्रमिक शेवते, कनिष्ठ अभियंता विशाल पाटील, गौरव कोलते, यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.
COMMENTS