SPV | Power Purchase | वीज खरेदी बाबत SPV केली  स्थापन करण्याच्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी 

HomeपुणेBreaking News

SPV | Power Purchase | वीज खरेदी बाबत SPV केली  स्थापन करण्याच्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी 

Ganesh Kumar Mule Jun 02, 2022 3:02 PM

PMC Pune Municipal Corporation | पुढील तीन वर्षे पुणेकरांना पुन्हा खोदलेल्या रस्त्यांना तोंड द्यावे लागणार | 500 किमी चे रस्ते खोदले जाणार | महापालिकेचे 500 कोटींचे होणार नुकसान
MAHAPREIT : PMC : उर्जा बचत प्रकल्पासाठी ‘महाप्रित’चा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार
SPV | Power Purchase | वीज खरेदी बाबत SPV केली जाणार स्थापन 

वीज खरेदी बाबत SPV केली  स्थापन करण्याच्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी

पुणे : महानगरपालिकेकडे ओपन अॅक्सेसव्दारे पॉवर खरेदी करणे या प्रकल्पांतर्गत महाप्रीत (MAHAPREIT ) या शासकीय संस्थेबरोबर Power Purchase Agreement (PPA ) करण्यात आले आहे. ज्यामध्ये 20 वर्षापर्यंत रु. 3.40/kwh या दराने वीज खरेदी करण्यात येणार आहे.  तसेच ओपन ॲक्सेसव्दारे वीज खरेदी करण्यासाठी  महाप्रीत ( MAHAPREIT ) या शासकीय संस्थेसोबत एसपीव्ही ( SPV ) स्थापित करणेत येणार आहे व SPV मधील सदस्य नियुक्तीचे अधिकार महापालिका आयुक्त यांना देण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
पुणे महानगरपालिकेकडून सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सुमारे 293 कोटी वीजखर्चापोटी तरतूद उपलब्ध करणेत आली असून यापुढील काळात वीजखर्चात बचत करणेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत वीज खरेदी म.रा.वि.वि.कंपनीकडून केली जात असून अन्य वीज कंपनीकडून कमी दरात ओपन ॲक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करणे फायद्याचे ठरणार आहे. यासाठी विद्युत विभागाने MERC च्या नॉर्मनुसार 1 MW पेक्षा जास्त बीज वापर असलेल्या वीज ग्राहकांची यादी तयार केली असून त्या ठिकाणी वापर होत असलेल्या वीज युनिट आणि
त्यापोटी अदा करण्यात आलेल्या रक्कमेची माहिती सोबत देण्यात आलेली आहे. या यादीनुसार विद्युत विभागास सर्व पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व उपसा केंद्रासाठी जवळपास 23 MW इतकी विजेची मागणी असून दर महीना अंदाजे 1,28,55,450 kwh युनिटचे म्हणजे
15,42,65,400 kwh युनिटचे दर वर्षी वापर होत आहे. यासाठी ओपन ॲक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करावयाचे झाल्यास MERC च्या नॉर्मनुसार 1 MW पेक्षा जास्त वीज वापर असलेल्या ठिकाणी ओपन ॲक्सेसमधून वीज खरेदी करता येणे शक्य असून त्याद्वारे वीज खरेदी केल्यास महावितरणकडून मिळत असलेल्या सध्याच्या वीज दरापेक्षा किमान 1.83 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक ( प्रति युनिट ) बचत करणाऱ्या दरामध्ये बीज खरेदी होवून प्रति महीना वीज वापरापोटी होणाऱ्या खर्चात अंदाजे रक्कम रु.2.35 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम प्रति महीना बचत करणे शक्य होईल म्हणजेच वार्षिक र.रु.28.23 कोटी पेक्षा जास्त रक्कम बचत होऊ शकेल.
 SPV मध्ये पुणे महानगरपालिकेकडून खालील सदस्य प्रस्तावित करण्यात येतील
महापौर, पुणे महानगरपालिका
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट)
मुख्य अभियंता (विद्युत), पुणे महानगरपालिका
एनर्जी सेव्हिंग या क्षेत्रातील तज्ञ.
महाप्रीत (MAHAPREIT) चे प्रतिनिधी,