PMC Sport Scholarships | शहरातील 344 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती

Homeadministrative

PMC Sport Scholarships | शहरातील 344 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती

Ganesh Kumar Mule Mar 24, 2025 8:15 PM

Water Supply Cut | पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद
Mohan Bhagwat | Pune | शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत पुण्यात काय बोलणार?
Cantonment Board Elections | पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या | मोहन जोशी

PMC Sport Scholarship | शहरातील 344 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती

| स्थायी समितीची मान्यता

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील जे खेळांडू राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून प्राविण्य मिळवितात अशा खेळांडूना पुणे महानगरपालिकेकडून (PMC Pune)  सुधारित क्रीडा धोरण 2018 (PMC Sport Policy) नुसार प्रतिवर्षी क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार 344 खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. वेगवेगळ्या 10 गटांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी महापालिकेला 87 लाख 20 हजाराचा खर्च येणार आहे.  याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

: 87 लाख 20 हजार येणार खर्च

सन 2024-25 या आर्थिक वर्षी क्रीडा शिष्यवृत्तीदेणेसाठी मागील दोन वर्षाची खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन क्रीडा शिष्यवृत्ती देण्याची कार्यवाही क्रीडा विभागामार्फत करण्यात येणार आहे. याकरीता जाहिरात देऊन खेळाडूंकडून अर्ज मागवून विहित अटी व शर्ती नुसार पात्र ठरलेल्या खेळाडूंना  क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मुदतीत शिष्यवृत्तीसाठी एकूण 743 अर्ज प्राप्त झाले होते. क्रीडा विभागाकडून प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर क्रीडा शिष्यवृत्तीसाठी 344 खेळाडू अर्जदार पात्र ठरले आहेत. क्रीडा विभागाकडून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी तयार करण्यात आली असून खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या 10 गटांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम 10 हजार पासून 50 हजार पर्यंत आहे. यासाठी महापालिकेला 87 लाख 20 हजाराचा खर्च येणार आहे. नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.