बुद्धनगरच्या कमानीला कायम स्वरूपी विद्युत व्यवस्था केल्याचा विशेष आनंद
: गणेश बिडकर यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांना खाऊचे वाटप तसेच विधी सेवा माहिती प्रदर्शन घेण्यात आले. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
करोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणारे स्वच्छता कर्मचारी, पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे, निलेश आल्हाट, रीना आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रभागातील मंगळवार पेठ मधील जुना बाजार गाडीतळ येथील तथागत भगवान गौतम बुद्धनगरच्या कमानीला कायमस्वरूपी साजेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. गेले अनेक वर्षांपासून हे काम प्रलंबित होते. हे काम पूर्ण झाल्याचा विशेष आनंद असल्याच्या भावना सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केल्या.
संविधानाने वाचन करून त्याचे आचरण करण्याची शपथ घेण्यात आली. स्मृतिचिन्ह तसेच राज्य घटनेची प्रत देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांना खाऊ वाटप देखील यावेळी करण्यात आले.
COMMENTS