कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!”
नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
करोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांनंतर यावर्षी पंढरीच्या वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (२० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मंगळवारी (२१ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारकऱ्यांच्या पोशाखातील मोठा बॅनर लावण्यात आला.
भाजपाने पुण्यात पालखीमार्गावरच नरेंद्र मोदी यांचा हा भव्य फ्लेक्स लावला…
विठू माऊली, संत ज्ञानेश्वर , संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत.
कभी कभी लगता है अपुन हि भगवान है ! pic.twitter.com/I9PEplKWlu
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 20, 2022
या बॅनरवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. खरंतर, भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज असं कुणीही दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून नाना पटोले यांनी ‘कभी कभी लगता है, अपुन ही भगवान है’ म्हणत मोंदीवर निशाणा साधला आहे.
त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. त्यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत. कभी कभी लगता है अपुन हि भगवान है !” त्यांचं हे ट्वीट आता वेगानं व्हायरल होत आहे.