Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा तिसरा टप्पा कधी सुरु होणार? | महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले स्पष्टीकरण
Pune Flyover – (The Karbhari News Service) – सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम सिनेमा दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपूलाच्या कामातील राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल व विठ्ठलवाडी कमान ते फन टाईम सिनेमा हा २१२० मी. लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीस यापूर्वीच खुला करण्यात आलेला आहे. तिसरा टप्पा कधी सुरु होणार, याबाबत नागरिक वाट बघून आहेत. कारण विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल उद्यापासून खुला करण्यात येणार आहे. याबाबत आता महापालिका प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, सध्यस्थितीत तिसऱ्या टप्प्यातील गोयलगंगा चौक ते इनामदार चौक हा १५४० मी. लांबीचा उड्डाणपूल पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुलाचे बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परंतु थर्माप्लास्टिक पेंट, साईनेजेस, हजार्ड मार्किंग बोर्ड, जंक्शन इम्प्रुव्हमेंट ही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची कामे सुरु आहेत. उड्डाणपूल सुरु करण्यापूर्वी इनामदार चौक, राजाराम चौक, मातोश्री चौक या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी वाहतुक विभागाचे सुचनेनुसार काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. उड्डाणपुलावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी विद्युत पोल कार्यान्वित करण्याचे काम सुद्धा सुरु आहेत. सदरची कामे सध्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे पूर्ण करणेस काही अडचणी येत असल्या तरी प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करून उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्याचे पुणे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे. असे सांगण्यात आले आहे.

COMMENTS