Shrinath Bhimale | पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले आयोजित भव्य महिला मेळावा  | लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा संपन्न व धो धो पावसात माता भगिनींनी कार्यक्रमास लावली हजेरी

HomeBreaking News

Shrinath Bhimale | पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले आयोजित भव्य महिला मेळावा | लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा संपन्न व धो धो पावसात माता भगिनींनी कार्यक्रमास लावली हजेरी

Ganesh Kumar Mule Aug 26, 2024 8:16 PM

Parvati Vidhansabha Election | ‘पर्वती’ साठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले! | उमेदवारी कुणालाही मिळू द्या, एकदिलाने काम करण्याचा निर्धार
Aba Bagul Parvati | ‘पर्वती फर्स्ट’ मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट! | एकत्र येऊ,आपले प्रश्न आपणच सोडवू: आबा बागुल
Madhuri Misal Parvati Vidhansabha | शक्तिप्रदर्शन करीत माधुरी मिसाळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Shrinath Bhimale | पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले आयोजित भव्य महिला मेळावा

| लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा संपन्न व धो धो पावसात माता भगिनींनी कार्यक्रमास लावली हजेरी

 

Parvati Vidhansabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा  मतदारसंघातील सर्व महिला बहिणींसाठी आयोजित केलेला भव्य महिला मेळावा ,लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा, आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अमृताफडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

गणेश कला क्रीडा मंच येथे सुमारे हजारो महिला भगिणींच्या उपस्थितीमध्ये हा विराट मेळावा संपन्न झाला. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेत लाभार्थी झालेल्या सर्व महिला भगिनींचा अमृता जी फडणवीस यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी त्यांचा लाडका आणि हक्काचा भाऊ असणाऱ्या श्रीनाथजींनी अतिशय उत्कृष्ट अशा मेळाव्याचे आयोजन केले आहे. पुण्यनगरीत आल्यानंतर स्त्री शक्तीचा असा जल्लोष पाहून मला अतिशय आनंद होत आहे.या मेळाव्यामध्ये आपण सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहिलात, आपण सर्वांनी शासनाच्या या उत्कृष्ट योजनेमध्ये सहभाग नोंदवला त्या बद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन.

आज प्रत्येक क्षेत्रात महिला भगिनी केवळ सहभाग नोंदवत नाही तर अग्रेसर आहेत. आपल्या सर्व महिला भगिनींना प्रोत्साहन देणे, आपल्या कार्यकर्तृत्वास वाव देणे आणि समाजात जीवन जगत असताना महिलांचे संरक्षण करणे या सर्व गोष्टी एका आदर्श भावाकडून होत असतात श्रीनाथ जी पर्वती विधानसभा मतदारसंघात करत असलेले कार्य अतिशय बहुमोल असे आहे”.

या महिला मेळाव्यामध्ये खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व प्राजक्ता माळी या दोन्ही अभिनेत्री उपस्थित होत्या.

” कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक महिला भगिनींनी अतिशय जल्लोषात व उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कार्यक्रमांमधील सर्व खेळांमध्ये सहभाग नोंदवला. स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्री शक्तीचा आदर या दोन्ही गोष्टी या मेळाव्यामध्ये आपणास पाहायला मिळाल्या. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ काढून पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी असा हा आगळावेगळा उपक्रम आपण आयोजित केला होता. या मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणाऱ्या माझ्या प्रत्येक माय माऊली भगिनीचे मी आभार व्यक्त करतो.” , असे यावेळी पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्या या लाडक्या भावा तर्फे आकर्षक साडी भेट म्हणून देण्यात आली तर इतर महिला भगिनींनी अनेक आकर्षक बक्षिसे देखील जिंकली.

या कार्यक्रमासाठी अमृताताई फडणवीस,खासदार मेधाताई कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, मा.नगरसेविका वंदनाताई भिमाले,मा.उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे,मा.उपमहापौर प्रसन्न दादा जगताप, मा.नगरसेवक.राजेंद्र आबा शिळीमकर,मा.नगरसेवक सम्राट थोरात,मा.नगरसेविका अनुसया चव्हाण,मा.भाजपा सरचिटणीस गणेश घोष,श्री.हरीश परदेशी,डॉ.तेजस्विनी गोळे आदींसह मोठ्या संख्येने पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनी उपस्थित होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0