Shrinath Bhimale Parvati Vidhansabha | पर्वती विधानसभेसाठी श्रीनाथ भिमाले यांची जोरदार तयारी  | कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

HomeBreaking News

Shrinath Bhimale Parvati Vidhansabha | पर्वती विधानसभेसाठी श्रीनाथ भिमाले यांची जोरदार तयारी  | कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

Ganesh Kumar Mule Oct 08, 2024 10:08 PM

Pune Airport Terminal | विमानतळ टर्मिनलचे उदघाटन मोदींसाठी थांबले हा प्रकार संतापजनक | माजी आमदार मोहन जोशी
Maharashtra News | राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणुक प्रकल्पांना मंजुरी | कोकणसह मराठवाडा, विदर्भात होणार २० हजार रोजगार निर्मिती
Ease of Living Survey 2022 | इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२ मध्ये सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

Shrinath Bhimale Parvati Vidhansabha | पर्वती विधानसभेसाठी श्रीनाथ भिमाले यांची जोरदार तयारी  | कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

 

Shrinath Bhimale Pune Parvati – (The Karbhari News Service) – राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. इच्छुकांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. राजकीय पक्षांकडे तिकीटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तर दुसरीकडे काही इच्छुकांनी आणखी पुढे पाऊल टाकलं आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून अशीच एक बातमी आली आहे. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ विरोधक माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. (Parvati Vidhansabha Election)

 

श्रीनाथ भिमाले यांनी आपण पर्वती मतदारसंघासाठी इच्छुक असून निवडणूक लढविणार असल्याचं सांगत कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. पुणे महापालिकेच्या विविध विभागांचं थकबाकी नसलेलं ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्यासाठी भिमाले यांनी काल पुणे महापालिकेकडे अर्ज केला. कोणत्याही उमेदवाराला निवडणुक लढवण्यासाठी कोणत्याही करांची थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणं बंधनकारक असतं. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास आणि त्यात तो थकबाकीदार असल्याचं आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जातो. यामुळंच श्रीनाथ भिमाले यांनी कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यासाठी महापालिकेत अर्ज केलाय.

निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या प्रत्येकाला कोणत्याही करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र त्याच्या उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक असल्याने ना हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे अर्ज करावा लागतो. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास आणि त्यात तो थकबाकीदार असल्याचे आढळून आल्यास त्याचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला जातो. २००४ पासून आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांच्यासमोर आता त्यांच्याच पक्षातील इच्छुकांनी आव्हान उभं केलं आहे.दरम्यान, महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मतदारसंघांचा निर्णय अद्याप झालेला नाही. पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा भाजपालाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाच्या इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. भिमाले यांनीही तिकीटासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पक्ष नेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना पक्ष नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. आता या मतदारसंघात कुणाला तिकीट मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“गेल्या पंधरा वर्षांपासून मी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून तयारी करत आहे. मात्र, मला पक्षाकडून वेळोवेळी रोखण्यात आलं. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझी पूर्ण तयारी झालीय. विद्यमान आमदार आमच्या पक्षाचे असले तरी मी पक्षाकडे माझी इच्छा व्यक्त केलीय. सणासुदीचे दिवस येऊन ठेपल्यानं महापालिकेला सुट्टी लागणार असून, अनेक निवडणुकांचा अनुभव असल्यानं कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.”

  • श्रीनाथ भिमाले 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0