Shrinath Bhiamle on PMC Budget | अंदाजपत्रक एका वर्षाचे सादर करणार असलो तरी शहराचे ५ वर्षांचे नियोजन करणार | श्रीनाथ भिमाले यांनी दिला विश्वास

HomeBreaking News

Shrinath Bhiamle on PMC Budget | अंदाजपत्रक एका वर्षाचे सादर करणार असलो तरी शहराचे ५ वर्षांचे नियोजन करणार | श्रीनाथ भिमाले यांनी दिला विश्वास

Ganesh Kumar Mule Feb 23, 2026 8:27 PM

Dr Yogesh Mhase IAS PMRDA | बांधकामासाठी लागणार वृक्ष प्राधिकरण सम‍ितीची परवानगी!
PMC Standing Committee | खराडीतील जळीतग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत | प्रत्येकी ११ हजार रुपये नुकसानभरपाईला स्थायीची मान्यता
Onion Price | राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा | प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Shrinath Bhiamle on PMC Budget | अंदाजपत्रक एका वर्षाचे सादर करणार असलो तरी शहराचे ५ वर्षांचे नियोजन करणार | श्रीनाथ भिमाले यांनी दिला विश्वास

| महसूल समितीच्या माध्यमातून घेणार विकासकामांचा आढावा

 

PMC Standing Committee Chairman – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी भाजपचे श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. लवकरच चालू आर्थिक वर्षाचे आणि या पंचवार्षिक मधील पहिले अंदाजपत्रक भिमाले सादर करतील. अंदाजपत्रक वार्षिक सादर करणार असलो तरी शहराचे ५ वर्षांचे नियोजन करणार असल्याचा विश्वास भिमाले यांनी यावेळी व्यक्त केला. (Pune PMC News)

श्रीनाथ भिमाले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे शहराच्या विकासासाठी ज्या संकल्पना आहेत, त्यात सत्यात उतरवण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार च्या माध्यमातून पुणे शहरात जे प्रकल्प राबवले जात आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच पीपीपी, सीएसआर फंडाच्या माध्यमातून जी कामे करणे अपेक्षित आहे ती आम्ही करणार आहोत आणि पुणे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहोत.

भिमाले यांनी पुढे सांगितले कि, स्थायी समिती अध्यक्ष पदाचा या वर्षभराच्या कालावधीत मी महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल, यावर भर देणार आहे. आम्ही विकासासाठी नुसतेच पैसे खर्च करणार नसून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी स्रोत देखील शोधणार आहोत. उत्पन्न वाढवण्यासाठी खूप स्रोत आहेत पण ते दिसत नाहीत, माझे मात्र उत्पन्न वाढवण्याचे नियोजन तयार आहे. भिमाले पुढे म्हणाले, महसूल समितीच्या माध्यमातून आम्ही उत्पन्न वाढवण्या बरोबरच विकासकामाचा देखील सातत्याने आढावा घेणार आहोत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: