Shrikant Patil on PMC Budget | पुणेकरांची फसवणूक करणारे अंदाजपत्रक | | शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांची टीका 

HomeBreaking News

Shrikant Patil on PMC Budget | पुणेकरांची फसवणूक करणारे अंदाजपत्रक | | शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांची टीका 

Ganesh Kumar Mule Mar 25, 2026 9:29 PM

PMC Contract Employees | पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख  विम्याची रक्कम प्राप्त
Recruitment | महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
Chhatrapati Sambhaji Maharaj Statue | महंमदवाडीत उभारला जाणार  छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता

Shrikant Patil on PMC Budget | पुणेकरांची फसवणूक करणारे अंदाजपत्रक | | शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांची टीका

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वर्ष २०२६-२७ अंदाजपत्रकावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणेकरांची फसवणूक करणारे अंदाजपत्रक असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. (PMC Budget 2026-27)

पाटील म्हणाले,  शासनाकडून पुणे महापालिकेचे २५०० ते ३००० कोटी जुने येणे अनेक प्रयत्न करूनही मिळत नाहीत. ते मिळत नसताना राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना पुणे महापालिकेला फ्लाईओवरसाठी ५०० कोटी मिळणार, ही शुद्ध फसवणूक आहे.

समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीचा निर्णय झाला नाही. हा निर्णय घेताना पूर्वीच्या ३७ गावांचा निर्णय या गावांना द्यावा लागणार आहे, त्यामुळे कर आकारणीचा निर्णय दोन वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. तो कधी घेणार, मुळात १ एप्रिल नंतर नवीन बिल येणार, त्यामुळे याबाबत अस्पष्टता आहे.

समाविष्ट गावांचा विकास आराखडा झाला नाही. रस्ते, पाणी नाही. अशा ठिकाणी तुलनेने बांधकामांची संख्या कमी आहे, त्यामुळे बांधकाम शुल्का पोटी मिळणारे उत्पन्न अशक्य आहे.

शेवटी महिला असू किंवा पुरुष ५०० चौरस फुटाच्या घरात राहणार्‍यांना मिळकत करात सरसकट सूट हवी होती, मात्र यातही पळवाट काढण्याचा प्रयत्न केला आहे. यातून सत्ताधार्‍यांचा अप्रामाणिकपणा दिसून येतो. असे श्रीकान्त वि पाटील म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0