Shri Shivchhatrapati Krida Sankul Balewadi | ऐकावे ते नवलच! | श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे नाव “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” | अमोल बालवडकर यांनी केली कारवाई ची मागणी 

Homeadministrative

Shri Shivchhatrapati Krida Sankul Balewadi | ऐकावे ते नवलच! | श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे नाव “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” | अमोल बालवडकर यांनी केली कारवाई ची मागणी 

Ganesh Kumar Mule May 23, 2025 3:52 PM

Vetal Tekdi | MP Supriya Sule | वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार |खासदार सुप्रिया सुळे 
Medical Management and IT Systems | एका क्लिकवर रुग्णाच्या पूर्वीच्या आजाराच्या उपचाराची माहिती मिळणार 
Warje Multispeciality Hospital -PMC| वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील |पुणे महापालिकेच्या एक वर्षापासून च्या अथक पाठपुराव्याला यश

Shri Shivchhatrapati Krida Sankul Balewadi | ऐकावे ते नवलच! | श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे नाव “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” | अमोल बालवडकर यांनी केली कारवाई ची मागणी

Amol Balwadkar – (The Karbhari News Service) – म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे गुगल मॅप वर “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलण्यात आले आहे. या  संबंधी कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर पोलीस स्टेशन कडे केली आहे. (Pune News)

बालवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार  बालेवाडी म्हाळुंगे स्थित श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या संदर्भात गुगल लोकेशन मॅपवर काही समाज कंटकांनी जाणून बुजून श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल ऐवजी “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलले आहे. तरी यामुळे आमच्या भागातील समस्त शिवप्रेमी, खेळाडू, ग्रामस्त व नागरिक अत्यंत संतप्त झाले असून अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमच्याकडे करत आहेत. गुगल ‘मॅप ला जाऊन अशा प्रकारे लोकेशन एडीट केले आहे. अशा प्रकारे नाव बदलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग करून केला जात आहे.
अशा प्रकारे गुगल मॅप च्या एडीट पर्यायाचा वापर करून इंटरनेट वरील हॅकर्स इतरही अनेक असे गुन्हे करू शकतात तरी याला वेळीच आळा घालावा. असे बालवडकर यांनी म्हटले आहे.

बालवडकर यांनी म्हटले आहे कि, गुन्हे हे शक्यतो Virtual Private Network वापरून केले जाते. तरी सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घ्यावा. तरी सदर प्रकरणातील दोषींना तातडीने शोधुन अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करावी व संबंधित गुगल लोकेशन मॅपवरील नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे. अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: