पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा
: आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश
: पूरग्रस्त ठिकाणची केली पाहणी.
पुणे: येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भागात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र तरीही यावर्षी पुन्हा नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रकार घडल्यास संबधित महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी विधी मंडळात केली जाईल असा इशारा पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला आहे.
येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात सातत्याने पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होत आहे. महापालिकेकडून तरीही ठोस उपाय योजना होत नाही. येत्या पावसाळ्यात पुन्हा पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या जागी पूराचे पाणी जमा होते अशा पूरग्रस्त ठिकाणे आणि नालेसफाईची कामे यांची पाहणी आमदार टिंगरे यांनी महापालिका अधिकारांसमवेत येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या विविध भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. त्यात प्रामुख्याने डाॅ बाबासाहेब आंबेडकर काॅलिनी, फुलेनगर, प्रतिकनगर, शांतीनगर, गंगा कूंज सोसायटी कळस, वैभव काॅलनी, धनेश्वर शाळा मुंजाबा वस्ती धानोरी, मयुर किलबिल सोसायटी लगत नाला धानोरी, लक्षमीनगर सोसायटी धानोरी, संकल्प सोसायटी लोहगाव, कर्मभूमी नगर लोहगाव व कलवड याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आमदार टिंगरे यांनी प्रत्येक पूराने बाधित ठिकाणी जाऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन काय काय उपाययोजना करतील यातील माहिती अधिकाऱ्याकडून घेतली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या संदर्भात येत्या गुरुवारी आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात येणार असल्याचे ही आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. यावेळी मा.नगरसेविका शितल सावंत, शशि टिंगरे, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, बंडू खांदवे, राजेंद्र खांदवे, मिलिंद खांदवे, विश्वास खांदवे, मा. नगरसेवक सतिश म्हस्के, डाॅ. राजेश साठे, निखिल गायकवाड, बंटी म्हस्के, विनोद पवार, सतिश धापटे, राहुल म्हस्के, दाजी शेटकर, सिध्दार्थ कांबळे, सुभाष खेसे, कुलदीप शर्मा, महेश खांदवे, अमित जंगम, राहुल टेकवडे, पंकज निकाळजे, बाबू कांबळे पुणे महानगरपालिका मलःनिसरण विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र मुळे, उप अभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता खरे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाचे पुणे मनपा सहायक आयुक्त वैभव कडलख, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
COMMENTS