Shivsena Pune | Pune Water Cut | पुणे शहराची पाणीकपात रद्द करा | शहर शिवसेनेची महापालिकेकडे मागणी
Shivsena Pune | Pune Water Cut | खडकवासला धरण (Khadakwasla Dam) जवळपास भरल्याने धरणातून मुठा उजवा कालवा मध्ये तसेच नदीतून पाणी सोडायला सुरुवात (Water Discharge) झाली आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस सुरु असलेली पाणीकपात (Water cut) रद्द करण्यात यावी. अशी मागणी शहर शिवसेनेकडून महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Water Cut)
याबाबत शिवसेना पुणे चे अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी सांगितले कि आजही पाणी कपाती मुळे पुणेकरांना हाल सोसावे लागत आहे. खडकवासला धरण साखळीत काल रात्री पर्यंत ६०% पाणी साठा जमा झाला आहे. तर एकटे खडकवासला धरण ८२% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण साखळी पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पाटबंधारे खाते नदीपात्रातून विसर्ग करण्याच्या दृष्टीने काम करीत असून नदीपात्रातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात रद्द करावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | Shivsena Pune | Pune Water Cut | Cancel Pune city water cut City Shiv Sena’s demand to the Municipal Corporation