Shivsena Pune on Municipal Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची पुणे शहर व जिल्ह्याची संवाद बैठक संपन्न !
| प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागात जाऊन संघटनेचा आढावा घेणार : मंत्री उदय सामंत
Pune News – (The Karbhari News Service) – शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री व शिवसेना संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक पार पडली. (Municipal Election)
या बैठकीस विधानपरिषद उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, कसबा विधानसभेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांच्यासह पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या बैठकीस पक्ष संघटना विस्तार आणि वाढीसाठी मंत्री उदय सामंत साहेब, डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी विविध उपक्रम, सदस्य नोंदणी, शाखा बांधणी, जनतेशी थेट संवाद साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली विकासकामे, विकास प्रकल्पांची माहिती, लोकहिताचे निर्णय तळागाळातील माणसांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, शिवसेनेचा पुणे जिल्हा संपर्क मंत्री झाल्यानंतर पहिलीच संवाद बैठकीला उपस्थित राहण्यात भाग्य मला लाभले असून संघटनेच्या बळकटीसाठी संपर्कमंत्री या नात्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि प्रभागात जावून संघटना बांधणीबाबत आढावा घेणार असल्याचे सांगितले. पक्षात कोणतीही गटबाजी न करता शिवसेना हा एकच गट या भावनेनं काम करा आणि एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन केले.
विधानपरिषद उपसभापती तहा शिवसेना नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, शिवसेना संघटनेच्या बांधणीसाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहे. शिवसैनिकांची एकत्रित मोट बांधून सामान्यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. शिंदे साहेबांचे परिश्रम, शिवसैनिकांची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद या जोरावर आपले विधानसभा निवडणुकीत 60 आमदार विजयी झाले असून संघटना बांधणीसाठी शाखेपासून सुरुवात करावी, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लोकहितासाठी घेतलेले निर्णय, लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन देखील निलम गोऱ्हे यांनी केले. त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक आणून पुनश्च शिवसेनेची ताकद अधोरेखित करण्याचा विश्वास व्यक्त केला.
COMMENTS