Shivsena Agitation | Pune | केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
Shivsena Agitation | Pune | केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana), पेन्शन योजना (Pension Scheme), भारतमाला, अयोध्या रामजन्मभूमी खरेदी , सह सात योजनांमधून मोठा घोटाळा झाल्याचे ताशेरे “कॅग” (CAG) ने आपल्या जाहिर केलेल्या अहवालात ओढले आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) कारभाराच्या विरोधात शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या (Shivsena UBT Pune) वतीने भ्रष्ट केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात डेक्कन येथे आंदोलन करण्यात आले. (Shivsena Agitation | Pune)
कॅगने आत्तापर्यंत ज्या राज्य सरकारवर व महापालिकेवर ताशेरे ओढले त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात आली. मग आता कॅगने ताशेरे ओढलेल्या, केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई होणार का ? यावर मोदी सरकार राजीनामा देणार का ? हा प्रश्न आंदोलकांनी विचारला.
मोदी सरकारचा निषेध करताना शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गौरव करीत ”देश का नेता कैसा हो उद्धव ठाकरे जैसा हो’ च्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवीत कॅगच्या अहवाला नुसार संबंधितांवर कारवाई करणार का असा प्रश्न केला ? टोल घोटाळा, हिंदुस्थान एराॅनाॅटिक्स, अयोध्या विकास प्रकल्प, द्वारका एक्सप्रेस वे, भारतमाला प्रकल्प, गोरगरिबांच्या आयुष्मान भारत, दिव्यांग, विधवा महिला, यांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर या भ्रष्ट केंद्र सरकारने पायउतार व्हावे असे ते म्हणाले.
यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे , उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, बाळासाहेब भांडे , सागर माळकर , शहर संघटक राजेंद्र शिंदे , किशोर राजपूत, अनंत घरत , संतोष गोपाळ, युवासेना अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारीख, उपशहरसंघटक नितीन पवार, उमेश गालिंदे , उमेश वाघ, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, महेश पोकळे, योगेश पवार, राजेंद्र शाह, अजय भुवड, विलास सोनवणे, संजय वाल्हेकर, अतुल दिघे, राहुल जेकटे, अजय परदेशी, दीपक शेंडे, नंदू घाटे, संतोष तोंडे, दिनेश बराटे, राम बाटुंगे, इम्रान खान, गजानन बगाडे, पराग थोरात, मकरंद पेठकर, सचिन देडे, अतुल कवडे, लोकेश जानगवळी, प्रतीक गालिंदे, आदिनाथ भाकरे, नागेश खडके, हर्षद ठकार, नितीन दलभंजन , समीर कानडे, रवी भोसले , सूर्यकांत पवार, तारीख शेख, बबलू पठाण, भावना थोरात , विजया मोहिते , सुरज गुळवे, अमोल घुमे, राहुल शेडगे, राजेश वाल्हेकर , संजय लोहोट , निलेश पाटील, नाना मरगळे, श्रीनिवास आखाडे, कल्पेश वाजे, अविनाश मांजरे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
——-
News Title | Shivsena Agitation | Pune | Shiv Sena’s agitation against the central government