Shivrajyabhishek Din  | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यात फडकवला तिरंगा ध्वज

HomeBreaking Newssocial

Shivrajyabhishek Din  | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यात फडकवला तिरंगा ध्वज

Ganesh Kumar Mule Jun 10, 2023 11:00 AM

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे
Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद |  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती
Shivshrishti | राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारल्या जाणार

Shivrajyabhishek Din  | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यात फडकवला तिरंगा ध्वज

Shivrajyabhishek Din |मराठवाडा जनविकास संघ, हैदराबाद (मराठवाडा) मुक्ती संग्राम समिती, जनकल्याण प्रतिष्ठान, जामगाव ग्रामस्थ (ता. माढा, जि सोलापूर) व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती धाराशिव यांच्या संयुक्तपणे शिवराज्याभिषेक दिन व मराठवाडा मुक्तीसंग्राम, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांचा ऐतिहासिक वाडा आझाद मुक्तापूर (स्वराज्याच्या राजधानीचा वाडा) या ठिकाणी तिरंगा ध्वज माजी आमदार पांडुरंग पाटील यांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने झेंड्यास मानवंदना व सलामी देण्यात आली.       (Shivrajyabhishek Din)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डुवाडीचे उपसभापती सुहास पाटील यांनी केले.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, नितीन चिलवंत, शिवकुमारसिंह बायस,  अमोल लोंढे , कॅप्टन प्रमोद आंग्रे , सोमनाथ कोरे, मुरलीधर होनाळकर , धर्मवीर जाधव , सोमनाथ शेटे ,जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे , पिंटु नाईकवडे , मारुती जगदाळे ,माजी आमदार  विनायकराव पाटील , सुहास पाटील , दादासाहेब पाटील , शिवाजी संकपाळ , सुजीत पाटील , शाहीर चव्हाण , रामचंद्र पाटील , भारत लटके , राजेंद्र गुंड , मारुती शिंदे , रघुनाथ मिरगणे , रामचंद्र आवारे , नारायण अरगडे , गोंविदराव पाटील , बळीराम गुरव , भिमराव श्रावणे , विजय जाधव आदी उपस्थित होते.

उपसभापती सुहास पाटील सांगितले, की स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांच्या घरातील वंशज असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच बरोबर येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आझाद मुक्तापूर स्वराज्य प्रेरणास्थळ निर्माण व्हावे, ६५ गावातील जुने ऋणानुबंध पुन्हा दृढ व्हावेत, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

तहसिलदार विनोद रणनवरे म्हणाले, की मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास व आझाद मुक्तापूर स्वराज्याचा इतिहास शालेय पाठयपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावा लागणार आहेत. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी सांगितले, की स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील जामगावकर यांचा मोठा त्याग, बलिदान, शौर्याचा संघर्षमय इतिहास आहे. त्यांची प्रेरणा घेऊन २१ व्या शतकातील विकृत मनोवृत्तीशी, व्यसनाशी सामना करावा लागणार आहे.

नितीन चिलवंत यांनी सांगितले, की आझाद मुक्तापूर स्वराज्य प्रेरणास्थळ जामगावात उभा करण्यात मराठवाडा जनविकास संघ पुढाकार घेणार आहे. वृक्षमित्र अरुण पवार यांच्या माध्यमातून प्रेरणास्थळ उभा करण्यासाठी आर्थिक निधी उभा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर शिवराज्याभिषेकाची प्रेरणा घेऊन हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी जामगाव येथे ६ जून १९४८ रोजी म्हणजे २७५ वर्षा नंतर रामराज्य आझाद मुक्तापूर स्वराज्य स्थापना करुन मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मराठी माणसांपुढे माहिती सांगण्याचा आपला प्रयत्न होता.

जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी आझाद मुक्तापूर स्वराज्य प्रेरणास्थळ निर्माण कार्यासाठी सढळ हाताने मदत करू आणि इतर ठिकाणाहून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून सहकार्य करू असे सांगितले त्याच बरोबर पत्रकार मारुती जगदाळे यांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त सहकार्य करू आणि लवकरात लवकर स्वराज्य प्रेरणास्थळ स्मारक उभा राहील यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

कार्यक्रमात ६५ गावातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजाचा सन्मान करण्यात आला. यावेळी ६५ गावातील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज चव्हाण यांनी, तर आभार गोपीनाथ गवळी यांनी मानले.


News Title | Shivrajyabhishek Din | On the occasion of Shiv Rajya Abhishek Day, the Tricolor flag was hoisted at the historic palace of freedom fighter Vitthalrao Patil.