बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध
: महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
पुणे : बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध केला असून परीसरात नविन नाट्यगृहाची निर्मिती करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रशासनाने जर हा प्रस्ताव जबरदस्तीने पुणेकरावर लादण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना ” पुणेकराच्या वतीने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेनेने माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शाम देशपांडे, प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करीत निवेदन दिले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नव्याने मॉल, मल्टीपर्पज हॉल, व छोटे-मोठे तीन नाटयगृह बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बालगधर्व रंगमदिर हे नाटयक्षेत्रातील कलावतासाठी व पुणेकरांसाठी एक अस्मितेचे प्रतीक आहे. आपल्याला नवीन नाटयगृह बांधायची असेल तर जुने बालगंधर्व रंगमंदिर न पाडता त्याच्या आजूबाजूला तुम्ही नवीन नाटयगृह बाधू शकता. दोन वर्षापूर्वी सुध्दा या प्रस्तावाला पुणेकरानी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,
नाटय कलाकार यांनी विरोध केल्यामुळे हा विषय थाबविला गेला होता.परंतु आता परत या विषयाला सुरूवात करण्यात आली असून, मनपा नक्की कोणाच्या हितासाठी हे करत आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
आजपर्यंत कोणतेही नाटयगृह हे दहा वर्षाच्या आत बांधून पूर्ण झालेले नाही हे बालगधर्व रंगमंदिर पाडून बांधण्यास शिवसेना पक्षाचा विरोध आहे. आपण बालगंधर्व मंदिराची आहे ती वास्तू ठेऊन नवीन विस्तारीकरण करून नवीन नाटयगृह बांधण्यास शिवसेना पक्षाचा विरोध नाही. प्रशासनाने जर हा प्रस्ताव जबरदस्तीने पुणेकरावर लादण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना ” पुणेकराच्या वतीने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
COMMENTS