Nana Bhangire | ढाल-तलवार तळागाळापर्यंत पोहोचवणार | पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची पहिली प्रतिक्रिया 

HomeपुणेBreaking News

Nana Bhangire | ढाल-तलवार तळागाळापर्यंत पोहोचवणार | पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची पहिली प्रतिक्रिया 

Ganesh Kumar Mule Oct 11, 2022 12:56 PM

Pune Uviersity Chowk Flyover | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण
Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार! 
Sugar Production | साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

ढाल-तलवार तळागाळापर्यंत पोहोचवणार | पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची पहिली प्रतिक्रिया

पुणे | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटालाअर्थात बाळासाहेबांची शिवसेनेला  कुठले चिन्ह मिळणार, याबाबत महाराष्ट्रभर उत्सुकता होती. अखेर आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे. त्यावर शिंदे गटाचे अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पुण्याचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी याचे स्वागत केले आहे. भानगिरे म्हणाले, ढाल तलवार हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. तशी योजना आखण्याचे काम सुरु आहे.
नाना भानगिरे पुढे म्हणाले, चिन्ह मिळल्यामुळे आनंद झाला आहे. पक्ष वाढीसाठी आता प्रयत्न केले जातील. पुणे शहरात आता जोमाने काम सुरु होईल. पुढील आठवड्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये शहराच्या प्रश्नाबाबत आढावा घेऊन नियोजन केले जाईल. यामध्ये खास करून शहराचे रखडलेले प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, 40% टॅक्स सवलत, 34 गावांना आवश्यक 9 हजार कोटींचा निधी, रस्त्यावरील खड्डे, सांडपाणी प्रकल्प, नदी सुधार योजना, मेट्रोचा विस्तार अशा सर्व विषयावर चर्चा केली जाईल. तसेच यामध्ये गती आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच याबाबत कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्याना सूचित केले जाईल. असे ही भानगिरे म्हणाले.