Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!

HomeBreaking Newsपुणे

Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!

Ganesh Kumar Mule Sep 22, 2023 1:57 AM

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन
PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिका 25 तृतीयपंथीयांना घेणार कामावर! 
PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी 

Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!

Shetkari Athvade Bajar | महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात (Pune Municipal Corporation) संत शिरोमणी सावता माळी रयत शेतकरी आठवडे बाजार (Sant Shiromani Savta Mali Rayat Shetkari Athvade Bajar) आयोजित करणारे शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी बचत गट व आयोजक यांची बैठक उप आयुक्त अतिक्रमण महानगरपालिका यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करणेत आली होती. बैठकी मध्ये शेतकरी आठवडे बाजार भरविताना महापालिकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या बाबत माधव जगताप उप आयुक्त अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग (PMC Deputy commissioner Madhav Jagtap) यांनी शेतकरी आठवडे बाजार आयोजक यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आठवडे बाजार नियोजन करिता काही  निर्णय घेण्यात आले. (PMC Pune)

शेतकरी आठवडी बाजार आयोजकांसाठी पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात आलेली नियमावली पुढील प्रमाणे
१) शेतकरी आठवडी बाजार आयोजन करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी किवा शेतकऱ्यांची सहकारी संस्था असणे बंधनकारक असावे. संस्थेचे किमान २५० शेतकरी सभासद असावेत.
२) आयोजक संस्थेचे स्थापने पासून आज अखेरीस नियमित लेखा परीक्षण व विविध कर भरणा केलेला असावा.
३) बाजार आयोजन करत असतांना आवश्यक कर, भाडे अथवा फी ची भरणा नियमित करून त्या संबंधित अहवाल कार्यलयाकडे सादर करावा.
४) शेतकरी बाजार चालू करण्यापूर्वी साधारणपणे शेतकरी गट अथवा शेतकरी कंपन्यांची नोंदणी महानगरपालिका कार्यालयात करून अधिकृत मान्यता घ्यावी व त्यानंतरच शेतकरी बाजार सुरु करावा.
५) शेतकरी बाजारांमध्ये शेतमाल विक्री करणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या संस्था यांना आयोजक संस्थेचे कायम स्वरूपी सभासद करून घेणे बंधनकारक आहे.
६) सभासद फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम अथवा इतर कोणत्याही स्वरुपात अवाजवी रक्कम स्वीकारता येणार नाही. अशाप्रकारची कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ आयोजकांची परवानगी रद्द करण्यात येईल.
७) शेतकरी आठवडी बाजार अनाधिकृतपणे रस्त्यावर अथवा फूटपाथवर अतिक्रमण करून सुरू करता येणार नाही.
८) महापालिकेच्या मालकीच्या अमेनिटी स्पेस अथवा राखीव जागेवर विना परवानगी शेतकरी आठवडे बाजार सुरू करता येणार नाही.
९) सहभागी गटांनी ओळखपत्र, गणवेश, गटांचे प्रोफाईल, नोंदणी प्रमाण पत्र, कृषी अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र, इत्यादी कागदपत्रे स्वतः जवळ कायमस्वरूपी ठेवणे व त्याची एक प्रत आयोजक संस्थेकडे ठेवणे गरजेचे आहे.
१०) सहभागी होणाऱ्या गटांचे उत्पादित होणारे व भविष्यात नियोजित असलेले शेतमाल यांची यादी आयोजक संस्थेने देणे व त्याप्रमाणे मालाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
११) शेतकरी बाजारांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही तसेच अस्वच्छता व ग्राहकांना त्रास होईल अश्या प्रकारचे कोणतेही वर्तन केले जाणार नाही व तसे आढळल्यास कार्यवाहीस सहकार्य करण्याबाबतचे हमीपत्र सहभागी गट, शेतकरी यांनी आयोजक संस्थेकडे देणे कंधनकारक राहील.
१२) शेतकरी बाजारांमध्ये ताजा, स्वच्छ, निवडक व गुणवतापूर्ण शेतमाल विक्री करण्याबाबत तसेच स्वच्छ्ता, शांतता नीटनेटकेपणा ठेवण्याच्या सूचना सहभागी गटांना देऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी
करण्याबाबतची जबाबदारी आयोजकांची असावी.
१३) शेतकरी बाजार हि संकल्पना शेतकरी यांना उत्पन्न व ग्रामिण युवकांना रोजगार या उद्देशाने अस्तित्वात आली असल्यामुळे सदैव याच घटाकांचे हित जपण्याचे तसेच शेतकरी व ग्रामिण तरुणाना प्रोत्साहित करण्याचे आयोजकाचे धोरण असल्याबाबतचे हमीपत्र बंधनकारक असावे.
१४) शेतमाल विक्रीस शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट यांनी जागेची मागणी केल्यास अशा संस्थाना अथवा व्यक्तीना शेतकरी आठवडे बाजार आयोजकांनी योग्य कारणाशिवाय जागा नाकारल्यास सदर आयोजकांची परवानगी रद्द करणेत येईल.
१५) पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजार भरविताना प्रथम प्रकल्प संचालक आत्मा पुणे कृषि विभाग व पुणे महानगरपालिकेची परवानगी घेतल्या शिवाय पुढील शेतकरी आठवडे बाजार भरविता येणार नाहीत. आत्मा संस्थेकडे अर्ज दाखल केल्याची प्रत व हमीपत्र सादर केल्यानंतर महापालिकेची परवानगी देण्याची कार्यवाही करणेत येणार आहे