Sheikh Salla Dargah Pune | शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर शांततामय तोडगा | अली दारूवाला

HomeपुणेBreaking News

Sheikh Salla Dargah Pune | शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर शांततामय तोडगा | अली दारूवाला

गणेश मुळे Mar 09, 2024 2:50 PM

Encroachment Department of Pune Municipal Corporation (PMC) appeals to Hawker’s to release the seized goods within 7 days
PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध! 
Hong Kong Lane Pune |  Contempt of the resolution of the GB by the Pune Municipal Administration 

Sheikh Salla Dargah Pune | शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर शांततामय तोडगा | अली दारूवाला

 

Sheikh Salla Dargah Pune – (The Karbhari News Service) – पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), पालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS), शेख सल्ला दर्गाचे विश्वस्त, राष्ट्रीय अल्पसंख्यंक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला (Ali Daruwala) आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर तोडगा निघाला असून पुणेकरांच्या सलोखा, सामंजस्याचे दर्शन घडले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शनिवारी पोलिस आयुक्त कार्यालयात सर्व संबंधितांच्या बैठकीत दर्गाच्या विश्वस्तांनी २०१९ नंतरचे अतिक्रमण स्वताहून काढण्याची भूमिका घेतली. या बैठकीत शांततेत संवाद झाला आणि तोडगा निघाला, असे अली दारूवाला यांनी सांगितले. अमितेश कुमार विक्रम कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री. पवार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पोलिस उपआयुक्त संदीप गील, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, दर्गा विश्वस्त आदी उपस्थित होते. दर्गा संबंधी तणावाच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अली दारूवाला यांनी केले आहे