Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध 

HomeBreaking Newsपुणे

Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध 

Ganesh Kumar Mule Jun 08, 2023 4:34 PM

NCP Pune | पुण्याला कोणी पालकमंत्री देता का.. पालकमंत्री …..?
Vedanta Foxconn Project | खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते | खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला
Senate Election | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध | महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Sharad Pawar News |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे नेते  शरद पवार (NCP Supremo Sharad pawar) यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे (MP Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane)  यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. (Sharad Pawar News)

यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, संतोष नांगरे , नितीन कदम , किशोर कांबळे , अमोल ननावरे , अजिंक्य पालकर , मूणालिणी वाणी , शशिकला कुंभार , सुशांत ढमढेरे , मंगेश जाघव ,संकेत शिंदे , प्रतिक कांबळे , बाळासाहेब अटल समिर पवार व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (NCP Pune Agitation)

राणे बंधू हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर अतिशय खालच्या भाषेत वक्तव्ये करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांना टिकेचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी अवश्य वापरावा परंतु आपले वडील देखील ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात त्यांच्यावर खालच्या भाषेत टिका करताना राणे बंधू यांनी किमान लाज बाळगावी अशी टिका यावेळी करण्यात आली
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.राणे बंधू यांनी यापुर्वी अनेक वेळा मर्यादा सोडून वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता केवळ संसदीय लोकशाहीतील संस्कारामुळे शांत आहे परंतु जर तो भडकला तर राणे बंधूंना पळता भुइ थोडी होइल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिला आहे.


News Title |Sharad Pawar News | Raneputra protested by Pune Nationalist Congress