Good News For PMPML Employees | पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू | डिसेंबर च्या वेतनात फरकाची ५०% रक्कम जमा केली जाणार

HomeपुणेBreaking News

Good News For PMPML Employees | पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू | डिसेंबर च्या वेतनात फरकाची ५०% रक्कम जमा केली जाणार

Ganesh Kumar Mule Dec 26, 2022 3:32 PM

7th Pay Commission Latest news | वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा 
7th Pay Commission : PMC : अखेर वेतन आयोगानुसार वेतन होण्यास सुरुवात 
7th Pay Commission | PMC Pune retired employees | 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महापालिकेतील सेवकांना अजूनही 6 व्या वेतन आयोगाप्रमाणेच पेन्शन! 

पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू | डिसेंबर च्या वेतनात फरकाची ५०% रक्कम जमा केली जाणार

पुणे : पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना (PMPML employees) अखेर सातवा वेतन आयोगा (7th pay commission) लागू झाला आहे. त्यानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगा नुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात आयोगाच्या फरकानुसार वाढणाऱ्या वेतनाची 50 टक्के रक्कम जमा केली जाणार आहे. तर जानेवारी 2023 मध्ये आयोगा बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरीत 50 टक्केवाढीनुसार, वेतन देण्यास सुरूवात केली जाणार आहे.(7th pay commission for PMPML Employees)

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. तसेच पीएमपी कामगार संघटना देखील यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यानंतर, आज पीएमपी मध्ये या मागणीबाबत बैठक घेण्यात आली. त्यात, हा निर्णय घेण्यात आल्याचे भानगिरे यांनी सांगितले. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया (PMP CMD Omprakash Bakoriya) यांनी ही बैठक घेतली. नाना भानगिरे यांच्यासह कामगार प्रतिनिधी नरेंद्र आवारे, श्रवण तौर, उमेश पांढरे यावेळी उपस्थित होते. (7th pay commission)

भानगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी कामगारांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, ही बैठक घेण्यात आली. यात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक बकोरिया डिसेंबर महिन्याच्या वेतनापासूनच सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसारची 50 टक्के वेतनवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून जानेवारी महिन्यात याबाबत अंतीम निर्णय होऊन त्यानंतर आयोगानुसार, उर्वरीत 50 टक्के रकमेचे वेतन सुरू केले जाणार आहे. या शिवाय, पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा निश्‍चित करणे , वैद्यकीय बिलांसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून तसेच डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे , कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करणार अशा मागण्याही मान्यता करण्यात आल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले. (PMPML pune)
—————————

कामगार संघटनेच्या सोबत आज बैठक झाली. त्यानुसार, सातव्या वेतन आयोगाच्या नुसार, वेतनाच्या फरकात 50 टक्केवाढ केली जाणार आहे. त्याबाबत उद्या ( मंगळवारी) अधिकृत आदेश काढला जाणार आहे. तर उर्वरीत वेतनवाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर घेण्यात येईल.

ओम प्रकाश बकोरीया ( अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल)