Serum Institute of India | सिरम संस्थेला महापालिका देणार 15 लाख लिटर प्रती दिवस विना प्रक्रिया केलेले पाणी!

Homeadministrative

Serum Institute of India | सिरम संस्थेला महापालिका देणार 15 लाख लिटर प्रती दिवस विना प्रक्रिया केलेले पाणी!

Ganesh Kumar Mule May 23, 2025 5:07 PM

Hadapsar Animal Hospital | विरोध होऊनही हडपसर प्राणी  हॉस्पिटलचा  प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर | महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचा निर्णय
Walk-in cooler system for storing vaccine stock of Pune Municipal Corporation is working
PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदावर यांना मिळाली पदोन्नती | अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश 

Serum Institute | सिरम संस्थेला महापालिका देणार 15 लाख लिटर प्रती दिवस विना प्रक्रिया केलेले पाणी!

| पाणी घरगुती कामासाठी वापरणे बंधनकारक

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला पुणे महापालिका  15 लाख लिटर प्रती दिवस विना प्रक्रिया (raw water) पाणी देणार आहे. विनाप्रक्रिया (raw water) पाण्यासाठी 27.46 प्रति किलो लिटर  या दराने बिल आकारणी केली जाणार आहे. तसेच या दरामध्ये प्रतिवर्षी 10% वाढ केली जाणार आहे. दरम्यान हे पाणी घरगुती कामासाठी वापरणे संस्थेसाठी बंधनकारक असणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुणे महानगरपालिकेकडे 15 लाख लिटर प्रति दिवस पाणी पुरवण्याची मागणी केलेली होती. सिरम  ही एक जगातली नामांकित सर्वात जास्त लस तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी पुणे शहरातील हडपसर व मांजरी भागातील 100 एकर क्षेत्रावरती प्रस्थापित आहे. या कंपनीमध्ये पत्रात नमूद केल्याप्रमाणे 10,000 कामगार काम करीत आहेत. सदर कंपनी लस बनवत असल्याने कामगारांना एंट्री व एक्झिट पॉईंटच्या इथे कामगारांच्या स्वच्छतेसाठी स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे कॅन्टीनही अखंडितपणे चालू असते. यामुळे या कंपनीमध्ये पाण्याचा वापर ही जास्त आहे. पुणे महानगरपालिकेकडून 0.27 MLD प्रति दिवस पाणी पुरवले जात आहे.  कामगारांची संख्या 10,000 विचारात घेता 45 लिटर प्रतिव्यक्ती याप्रमाणे 4,50,000 लिटर पाण्याची आवश्यकता असून याचसाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी 1.5 MLD प्रति दिवस पाण्याची मागणी केलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठेच्या धोरणानुसार बिगर घरगुती वापरासाठी 45 लिटर प्रतिव्यक्ती पाणी पुरविणे आवश्यक आहे. तथापि याठिकाणी लस उत्पादनाचे काम असल्याने प्रत्येक कामगारास कंपनीमध्ये येताना व जाताना असे दोन वेळेस स्नान करावे लागते असे त्यांनी त्यांचे पत्रात नमूद केले आहे . याचा विचार करता त्यांचे मागणीप्रमाणे 1.50 MLD रॉ वॉटर देणेस हरकत नाही. यानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या कामगार संख्येनुसार 15,00,000/- लक्ष लिटर प्रतीदीन पाणी पुरवावे लागेल.

कंपनीने एम्प्रेस गार्डन येथून पाणी पुरवावे असे नमूद केलेले आहे. पुणे महानगरपालिकेकडून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी लष्कर जेलकेंद्र ते एम्प्रेस गार्डन पर्यंत टाकण्यात आलेल्या 800 mm व्यासाच्या लाईन मधून पूर्वी पाणी पुरवले जायचे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची वितरण लाईन जुनी झाल्याने एम्प्रेस गार्डन येथून पाणी घेणे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी बंद केले आहे. सद्यस्थितीमध्ये या 800 mm व्यासाच्या एम्प्रेस गार्डन येथील लाईन मधून अॅमनोरा पार्क टाऊनशिप प्रकल्प यांना 6.50 एम.एल.डी. प्रति दिवस पाणी पुरवले जात आहे. अॅमनोरा पार्क टाऊनशिप प्रकल्पास पाणी पुरवण्यासाठी या लाईनच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचा खर्च अॅमनोरा पार्क टाऊनशिप प्रकल्प यांचेकडून भरून घेण्यात आलेला आहे. अॅमनोरा पार्क टाऊनशिप प्रकल्प यांची दैनंदिन मागणी 15.85 एम.एल.डी. एवढी असून सदर मागणी पूर्ण करण्यासाठी अॅमनोरा पार्क टाऊनशिप प्रकल्प व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे लष्कर जलकेंद्र येथे संपवेल बांधण्याचे काम चालू आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर लष्कर जलकेंद्र ते एम्प्रेस गार्डन पर्यंतची लाईन अॅमनोरा पार्क टाऊनशिप प्रकल्प साठी वापरावी लागणार आहे. यामुळे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना एम्प्रेस गार्डन येथून पाणी उचलावयाचे झाल्यास एम्प्रेस गार्डन ते लष्कर जलकेंद्र त्यांच्या पाण्याच्या मागणीनुसार पुरवणे शक्य आहे.मागणी पूर्ण होईपर्यंत एम्प्रेस गार्डन येथून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना अशुद्ध पाणी आवश्यक क्षमतेची लाईन टाकणे आवश्यक होणार आहे.

सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेस पाटबंधारे विभागाकडून सादर होणाऱ्या  पाण्याच्या बिलांमध्ये Dam Commercial use साठी रु.9.90 प्रती किलोलिटर (m) असा दर विना प्रक्रिया (raw water) पाण्यासाठी आहे. पाटबंधारे विभागाकडून पुणे महानगरपालिकेस 125% पेक्षा जास्त पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या दरावर 100% STP पेनल्टी आकारली जात आहे. याचा विचार करता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना मूळ दर रु. 19.80 हा दर घेणे आवश्यक आहे. हा दर तसेच यासाठी विकसित केलेल्या पायाभूत सुविधा जसे पंपिंग यंत्रणा, वीज खर्च याचा विचार करता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 1.50 एम.एल.डी. पाण्यासाठी रक्कम रुपये 27.46 प्रती किलो लिटर (m) आवश्यक आहे.तसेच या दरामध्ये प्रतिवर्षी 10% वाढ अपेक्षित आहे.

पुणे महानगरपालिकेकडून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना 1.50 एम.एल.डी. विना प्रक्रिया (raw water) पाणी पुरविल्यानंतर कंपनीने हे पाणी शुद्ध करून कामगारांना घरगुती वापरासाठी पुरविणे बंधनकारक राहील याचा वापर कंपनीने औद्योगिक वापरासाठी करता कामा नये,तसेच विनाप्रक्रिया पाण्याचे (raw water) दरामध्ये पाटबंधारे विभागाने वाढ केल्यास त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे, हि बाब कंपनीस बंधनकारक राहील. असे प्रस्तावात म्हटले आहे.