पुण्यातील शाळा-महाविद्यालये 1 फेब्रुवारी पासून होणार सुरु
: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली नियमावली
पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं. (Pune School Reopen News)
यासाठी नव्याने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे. (Schools reopen in pune) तसेच राज्यातील महाविद्यालयं देखील येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. संबंधित नियमावली एका आठवड्यासाठी असणार असून ती पहिली ते आठवीसाठी लागू होणार असल्याचं पवार म्हणाले.
काय असेल नियमावली? (Guidelines for school)
शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार, शाळेची वेळ फक्त चार तास – विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं, आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचं, मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी टाळणार, पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावं९वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू८वी पर्यंतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार५० टक्के क्षमतेने शाळा सुरू होणार, रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात याव्या.
COMMENTS