Santosh Jagdale | Kaustubh Ganbote | पर्यटकांवरील हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल!| चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गनबोटे आणि जगदाळेंना श्रद्धांजली
Chandrakant Patil – (The Karbhari News Service) – काश्मीर मध्ये पर्यटकांवर क्रूरपणे हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा, इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी ना. पाटील यांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली, तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. (Pune News)
यावेळी ना. पाटील म्हणाले की, हल्ल्याची कुटुंबियांकडून हकिकत ऐकून मन हेलावून गेलं. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरपणे पर्यटकांना लक्ष्य केलंय, त्यामुळे संपूर्ण देशच नव्हे; तर जगभरात संतापाची लाट आहे. माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर परिणाम दहशतवादी आणि त्यांच्या सर्व आकांना भोगावे लागतील.
COMMENTS