Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party | संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष २०२४ च्या निवडणुका लढवणार 

HomeपुणेBreaking News

Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party | संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष २०२४ च्या निवडणुका लढवणार 

Ganesh Kumar Mule May 27, 2023 10:38 AM

Will tax slab change in 2024 |  Finance Minister’s big announcement in the budget: 1 crore taxpayers will benefit
Progress Report | PMC Pune | 25 कोटींच्या वरील कामाचा दर 15 दिवसांनी आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार
Aapla Davakhana | राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party |  संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष २०२४ च्या निवडणुका लढवणार

| स्वराज्य पक्षाचे पहिलेच महाअधिवेशन

Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party | महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य पक्षातर्फे 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज पुण्यात अधिवेशनात आपल्या भाषणात बोलताना जाहीर केले. (Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party)


स्वराज्य पक्षाचे 1 ले महाधिवेशन आज शनिवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कोंढरे श्रीमंत कोकाटे,संयोगीताराजे भोसले शहाजीराजे भोसले माधव देवसरकर, विनोद साबळे, करणं गायकर,अंकुश कदम,फत्तेसिंग सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते य अधिवेशनात संभाजीराजे बोलत होते. (Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party)

ते म्हणाले की , सध्या राजकारणाची पातळी घसरली आहे त्याचबरोबर नेत्यांची ही पातळी घसरली आहे त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे. राजकारणातील सुसंस्कृतपणा सम्पला आहे. खोके बोके यावर फक्त चर्चा केली जाते संतांची महापुरुषांची नावे घेतली जातात पण आपला महाराष्ट्र तसा राहिला आहे का असा सवाल त्यांनी यावेळी केला. (first convention of the Swarajya Party)

2024 ची निवडणूक स्वराज्य पक्ष महाराष्ट्रात लढणार असून सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन करून ते म्हणाले की महाराष्ट्रातिल गडकिल्ले ही छत्रपती शिवाजी महाराजांची ठेव आहे त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे
डॉ धनंजय जाधव यांनी प्रास्ताविक केले रघुनाथ चित्रे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी शैक्षणिक, आरोग्य, शेतकरी ची प्रगती करणे आदी ठरावं यावर मंजूर करण्यात आले.-


News Title | Sambhaji Raje Chhatrapati’s Swarajya Party will contest the 2024 elections| The first convention of the Swarajya Party