Sushma Andhare news | व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात |  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

HomeBreaking Newsपुणे

Sushma Andhare news | व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात |  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

Ganesh Kumar Mule Jun 04, 2023 12:27 PM

G 20 in pune | जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा आज  पुण्यामध्ये होणार प्रारंभ
Hoarding | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत होर्डिंग वर कारवाई
GR | Property tax | 40% मिळकत कर सवलतीबाबतचा शासन निर्णय आला | २०१९ पासून ४०% सवलतीच्या रक्कमेची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येऊ नये

Sushma Andhare news | व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात |  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

 Sushma Andhare News | व्यंगचित्र (Cartoon) हे समाजप्रबोधनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम आहे. एका व्यंगचित्रामध्ये खूप मोठा आशय लपलेला असतो. व्यंगचित्रांच्या माध्यमातून दुखऱ्या, बोचऱ्या गोष्टी हसतखेळत मार्मिक पद्धतीने अगदी सहजतेने समाजापर्यंत पोहोचवता येतात, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Shivsena UBT Deputy leader Sushma Andhare) यांनी व्यक्त केले. (Sushma Andhare News)

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळकडू’ या व्यंगचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, अमित पापळ यांनी केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, प्रशांत राणे सचिव मकरंद पेटकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसाद चावरे, गणेश वायाळ, नंदू येवले, नितीन रावळ, संजय साळवी, मनीष घरत,राजेश शेलार, दिनेश पोटे, गणपत साळुंखे, दिलीप पोमन, प्रकाश चव्हाण, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, धनराज गरड, अमित पापळ आदी यावेळी उपस्थित होते. (Shivsena UBT)

अंधारे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्रांतून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. व्यंगचित्रांतून ठाम पद्धतीने मांडणी करण्यासाठीदेखील धाडस लागते. ते धाडस शिवसेनाप्रमुखांमध्ये होते. कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. (Shivsena UBT deputy leader Sushma andhare)

यावेळी संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, मुकीम तांबोळी, धनराज गरड यांनी मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत युवा गटामध्ये (१८ वर्षांखालील गट) प्रथम क्रमांक यश गायकवाड, द्वितीय क्रमांक निमिश सामंत, तृतीय क्रमांक मनोमय नार्वेकर यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक आभास शिळीमकर, शेराता क्षत्रिय, जीजा पापळ यांना प्रदान करण्यात आली. खुल्या गटामध्ये विजय नांगरे यांनी प्रथम, सुनील नेटके यांनी द्वितीय, श्रीपाद पालकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर वासुदेव बोंदरे, तोफिक बागवान, मुकीम तांबोळी, गौतम धिवार, शरद महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले.

आयोजकांनी बाळकडू व्यंगचित्र स्पर्धा ही स्पर्धा म्हणजे एक मशाल असून ती सतत पेटत ठेवण्याचा निर्धार केला असे मत व्यक्त केले.


News Title |Sad things can be conveyed to the society in a poignant manner through cartoons Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare