Sachin Tawre | NCP | सचिन तावरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश
Sachin Tawre | NCP |माजी मंत्री श्री. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन तावरे (Sachin Tawre) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार गट) जाहीर प्रवेश झाला आहे. अशी माहिती पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिनजी तावरे यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निशाण देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. राजकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्यातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निश्चितच फायदा होईल व संघटनेच्या बांधणीसाठी ते अखंड कार्यरत राहतील असा विश्वास यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री. अंकुशआण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष श्री. रविंद्र माळवदकर, प्रकाशअप्पा म्हसके आदी मान्यवर उपस्थित होते.