Sachin Ahir | Shivsena UBT Pune | खडकवासलामध्ये शेकडोजणांचा शिवसेनेत प्रवेश

HomeपुणेBreaking News

Sachin Ahir | Shivsena UBT Pune | खडकवासलामध्ये शेकडोजणांचा शिवसेनेत प्रवेश

Ganesh Kumar Mule Oct 10, 2023 2:41 AM

Budget 2024 | अर्थसंकल्पात हवी गरिबी निर्मूलनासाठी तरतूद | जनअर्थसंकल्प प्रस्तावावरील चर्चेत मागणी
Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत
DHARA 2023 | पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना | महापालिका आयुक्त

Sachin Ahir | Shivsena UBT Pune | खडकवासलामध्ये शेकडोजणांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर – संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर

पुणे|  राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग आहे. आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे सत्र सुरूच असून, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर गेली आहे. हजारोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढत चालली आहे. अशावेळी महाराष्ट्राला केवळ सत्ताधारी नेतृत्व नको, तर राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी केले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रदीप दोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना अहिर बोलत होते. जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, शहर समन्वयक बाळा ओसवाल, विस्तारक राजेश पळसकर, नीलेश बडदे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी सचिन पासलकर, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, युवा सेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, संतोष गोपाळ, तालुकाप्रमुख तानाजी पवळे, उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले, समन्वयक गणपत खाटपे, शिवम लांडगे, निवृत्ती वाव्हळ यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर गेली आहे. आरोग्य विभागाचे जबाबदार मंत्र्यांकडून या परिस्थितीत जबाबदारी झटकून आपली कातडी वाचवली जात आहे. कोरोनाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ राज्यच सावरले नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्था देखील सांभाळून प्रत्येक प्रसंगाची व घटनेची जबाबदारी स्वतः स्वीकारली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. ‘फोक्सवॅगन’चा प्रकल्प पुणे जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात गेला. अनेक उद्योग बंद पडले, त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी चे वाढली आहे. तिघाडी सरकारमुळे हे प्रश्न निर्माण झाले असून, सरकारला धडा शिकवण्यासाठी ही या योग्य वेळ असल्याचे अहिर म्हणाले.

शिवसेनेत यांनी प्रवेश केला.
खडकवासला मतदारसंघातील प्रदीप दोडके, प्रीतम दोडके, केतन दोडके, भालचंद्र सणस, श्रीकांत चौघुले, स्वप्नील कांबळे, स्वप्नील उत्तेकर, अक्षय सावंत, विशाल साळवी, विठ्ठल दाभेकर, विजय पन्हाळे, अजय पन्हाळे, सूरज मैंदाड यांच्यासह अनेकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.