एस.सोमनाथ : इस्रोला मिळाले नवीन प्रमुख
: जाणून घ्या कोण आहेत एस.सोमनाथ
केरळमधील तिसरे प्रमुख
सोमनाथ 1985 मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रक्षेपण वाहनांच्या डिझाइनमध्ये मोठे योगदान दिले आहे. केरळचे शास्त्रज्ञ जी माधवन नायर आणि डॉ के राधाकृष्णन यांनी 2003 ते 2014 या कालावधीत अंतराळ संस्थेचे नेतृत्व केले. त्यानंतर सोमनाथ या शीर्षस्थानी पोहोचणारे तिसरे मल्याळी शास्रज्ञ आहेत.
अशी आहे वाटचाल
सोमनाथ यांनी एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमधून शिक्षण घेतले. केरळ विद्यापीठाच्या टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
1985 मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये दाखल झाले. सुरुवातीच्या टप्प्यात ते पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) प्रकल्पाशी संबंधित होते. ते VSSC चे सहयोगी संचालक (प्रकल्प) बनले आणि 2010 मध्ये GSLV Mk-III लाँच व्हेईकलचे प्रकल्प संचालक देखील झाले. नोव्हेंबर 2014 पर्यंत ते प्रोपल्शन आणि स्पेस ऑर्डिनन्स एंटिटीचे उपसंचालक होते.
COMMENTS