RPI : Halima shaikh : पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन येथे RPI चा धडक मोर्चा : आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांचे नेतृत्व 

HomeपुणेPolitical

RPI : Halima shaikh : पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन येथे RPI चा धडक मोर्चा : आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांचे नेतृत्व 

Ganesh Kumar Mule Nov 11, 2021 4:24 PM

Vadgaonsheri Assembly Constituency | वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर
Mahayuti Vs RPI | महायुतीला मतदान न करण्याची घेतली प्रतिज्ञा
Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन येथे RPI चा धडक मोर्चा

आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांचे नेतृत्व

पुणे : वडगाव बुद्रुक येथील जमीन खरेदी- विक्री व्यवसायीक विठ्ठल नामदेव पांगारे यांच्या समर्थनार्थ तसेच पांगारे यांना मिळत असलेल्या धमकी व पैशे मागणीच्या निषेधार्थ मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन, पुणे येथे धडक मोर्चा काढण्यात आला व सदर विषयाचे निवेदन देण्यात आले.

सदर विषयाची तक्रार विठ्ठल नामदेव पांगारे यांनी धायरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारींमध्ये बाजीराव दामोदर रायकर, विनोद बाजीराव रायकर, ऋषीकेश बाजीराव रायकर, पांडुरंग रायकर, ओंकार रायकर, ऋतुजा रायकर, शांताराम रायकर, सुजीत रायकर, रुपाली झगडे, अभिजीत रायकर, रविंद्र रायकर, अक्षय रायकर, अक्षता रायकर, लीलाबाई रायकर, संदीप रायकर, विद्या सांळुके, दिपाली झगडे यांच्या नावाने, सर्वांचा विरोधात तक्रार व निवेदन देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी सदर निवेदन स्वीकार करून यावर योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासीत केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0