सुधारित महागाई भत्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनात मिळणार!
: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा
: काय म्हटले आहे परिपत्रकात?
पुणे महानगरपालिका अधिकारी/सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे.केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मा, मनपा सभा ठ.क्र.३७२ दिनांक २३.१२.१९७७ ने धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना मे. केंद्र शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या दराने महागाई भत्ता देण्याचे धोरण असून त्याप्रमाणे केंद्र शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी सुधारित महागाई भत्ता मनपा अधिकारी व कर्मचारी यांना देणेत येतो , संदर्भ क्र. २ चे मान्यतेनुसार सद्यस्थितीत दिनांक ०१/०७/२०२१ पासुन महागाई भत्त्याचा सुधारित दर २५% ने वाढवून १६४% वरून १८९% दराने महागाई भत्ता माहे ऑगस्ट पेड सप्टेंबर२०२१ बिलातून फरक सह अदा केले आहे. संदर्भ क्र.१ अन्वये ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ३% बाढवून २८% वरून ३१% इतका करणेत आला आहे. सदरचा दर हा ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेण्यांना लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ज्ञानपानुसार पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/सेवकांना ३% दराने महागाई भत्ता वाढवुन २८% वरून म्हणजेच एकुण ३१ % दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस मा. महापालिका आयुक्त यांनी संदर्भ क्र.३ चे ठरावान्वये मान्यता दिली आहे. परंतु माहे जुलै २०२१ ते माहे ऑक्टोबर २०२१ या चार माहिनेच्या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी रक्कम ७ व्या वेतन आयोगप्रमाणे फरक अदा करतेवेळी अदा करण्यात येईल.
२. माहे नोव्हेबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या दोन माहिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (२८%वरून ३१%)फरक माहे जानेवारी २०२२ पेड इन फेब्रुवारी २०२२ चे वेतनातून अदा करणे.
सर्व मा.खातेप्रमुख/मा.महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत सेवकांना जरूर त्या सुचना देऊन या बाबत पुर्तता करावी.
COMMENTS