Children’s Day | रयत फाउंडेशनकडून बालदिनाचे औचित्य साधून 5 मुलांच्या शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी

HomeपुणेBreaking News

Children’s Day | रयत फाउंडेशनकडून बालदिनाचे औचित्य साधून 5 मुलांच्या शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी

Ganesh Kumar Mule Nov 14, 2022 1:23 PM

Majhi Ladki Bahin | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करण्याचे आवाहन
Pune Metro Ridership | सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ!
PMC Budget | १५ जानेवारी पूर्वी महापालिका आयुक्त अंदाजपत्रक सादर करणार नाहीत

रयत फाउंडेशनकडून बालदिनाचे औचित्य साधून 5 मुलांच्या शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी

रयत फाउंडेशन तर्फे बालदिनाचे औचित्य साधून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी रयत फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले.

असे प्रतिपादन केले की ही सर्व मुले उद्याचं भारताचं भविष्य आहेत यांनी व आपण सर्वांनी भारताला सार्वभौम राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबरने रयत फाउंडेशनचे खजिनदार विपुलजी सागवान यांनी असे प्रतिपादन केले की भविष्यात आर्थिक अडचणीमुळे कोणाचे शिक्षण थांबू नये म्हणून सध्या 5 मुलांच्या त्यांचे संपुर्ण शिक्षण पुर्ण होईपर्यंत सर्व शैक्षणिक साहित्य व फी स्वरूपात मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे. तसेच उपाध्यक्ष बालाजी काकडे रयत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव सर, ढोरे सर ,रयत फाउंडेशनचे अजय चव्हाण, प्रकाश घोडके, मारुती काकडे, नीरज सुतार, ओमकार भोईर, दिव्या जोशी, अभिजित कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.