लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता रखडली!
: विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी वेधले लक्ष
: महापालिका आयुक्तांना दिले पत्र
धुमाळ यांच्या पत्रानुसार कसबा पेठेत राजमाता जिजाऊ लाल महाल आहे. सदर लाल महाल मध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक स्मारक असल्याने त्या लाल महालाला ऐतिहासिक ओळख आहे. त्यामुळे रोज अनेक हजारो शिवप्रेमी नागरिक या लाल महालामध्ये दर्शनासाठी येत असतात. तसेच शनिवार दिनांक. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे सदर ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहे. लाल महाल सद्यस्थितीत अस्तिवातात असलेले स्वच्छतागृहांची अवस्था खुपच बिकट व अनेक अडचणी आहेत. पाण्याचे नळ तुटलेले आहे, फरशीचे टाईल्स तुटलेले आहे व दैनदिन स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे हजारोच्या संख्येने नागरिक येणार आहेत. त्यामुळे लाल महालातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी लाल महाल येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसराची स्वच्छता तातडीने करण्यात यावी. तसेच काही जागी आवश्यक असल्यास रंगरंगोटी करण्यात यावी. तसेच लाल महाल येथील देखभाल दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी कामय कामगरांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी.
COMMENTS