मतदार यादीत आजच नाव नोंदवून घ्या | आज शेवटचा दिवस
मतदारयादीत (voter list) नाव नोंदविण्यासाठीची (Registration) मुदत सोमवारी (ता. २६) संपुष्टात येणार आहे. मुदत सपंल्यानंतर मतदार नोंदणीचे अर्ज आल्यास संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने (Election dept) स्पष्ट केले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षात जाहीर झाल्यास २६ डिसेंबरपर्यंत अर्ज करणाऱ्या नागरिकांनाच मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (PMC election)
जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारयादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर प्राप्त हरकती व सूचना २६ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यापासून २६ डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नावनोंदणी केलेल्या नागरिकांचे अर्ज मतदार म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच या मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जाणार आहेत. २६ डिसेंबरनंतर मतदार नोंदणी अर्ज केलेल्यांची नावे ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (pune municipal corporation election)
महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्या जर फेब्रुवारी अथवा मार्च मध्ये जाहीर झाल्या तर ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणारी अंतिम मतदारयादी महापालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी मतदारयादीत आपले नाव आहे किंवा कसे, हे तपासावे. मतदारयादी नाव नसल्यास जास्तीत जास्त मतदारांनी मतदारयादीत नाव नोंदवावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.