पुणे महापालिकेत 448 पदांसाठी भरती!
| 10 ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज
| सरळसेवा पद्धतीने होणार भरती
पुणे | पुणे महापालिकेत एकूण 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवे मधील आहेत. इच्छुक उमेदवार यासाठी 20 जुलै पासून ते 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात.
वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या हेतूने राज्य सरकारने जून 2015 सालापासून महापालिकेतील भरती प्रक्रियेवर निर्बंध लागू केले होते. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. सरकारने याबाबतचे आदेश जारी केले होते. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की जाहिरात क्र.१/३९८ नुसार र्ग-२ मधील ४ पदे व वर्ग-३ दि.२०/०७/२०२२ पासुन हे उमेदवारांनी मधील ४४४ पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. १०/०८/२०२२ रोजी पर्यंत आहे. इच्छुक
https://pmc.gov.in/mr/ recruitments या संकेतस्थळावर दि.१०/०८/२०२२ रोजीचे २३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क,
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/ recruitments या लिंकवर
पाहण्यास उपलब्ध आहेत.
https://pmc.gov.in/mr/
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/
पाहण्यास उपलब्ध आहेत.
अशी भरली जाणार आहेत पदे
1. सहायक विधी अधिकारी (श्रेणी 2) | एकूण पदे – 4
2. लिपिक टंकलेखक. (श्रेणी 3). | एकूण पदे -200
3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) | एकूण पदे -135
4. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) | एकूण पदे -5
5. कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3) | एकूण पदे – 4
6. सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) | एकूण पदे – 100