PMC Pune Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती!   |  8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती! | 8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

Ganesh Kumar Mule Mar 08, 2023 2:21 AM

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव
PMC Pune Teachers Promotion | पुणे महापालिका शाळांतील 138 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती | मात्र शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक
Scanning | PMC Pune | मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या सर्व दस्तांचे होणार स्कॅनिंग! | 34 लाखांचा येणार खर्च

पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती!

|  8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

| सरळसेवा पद्धतीने होणार भरती

पुणे | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवार यासाठी 8 मार्च ते 28 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. १/१३६२ नुसार वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासुन ते दिनांक २८/०३/२०२३ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर दिनांक २८/०३/२०२३ रोजीचे२३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा
शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.
| ही आहेत पदे

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) (८ पदे)
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी (२० पदे)
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)
४) पशु वैदयकीय अधिकारी (२ पदे)
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (२०
पदे)
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)
९) औषध निर्माता (१५ पदे)
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद),
११) अग्निशामक विमोचक / फायरमन (२०० पदे)

राज्य सरकारच्या नियमानुसार गट ब आणि क मधील पदांसाठी ( फायरमन/ अग्निशमन विमोचन पदा व्यतिरिक्त) परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. तर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जासमान राहतील. प्रति प्रश्न 2. गुण प्रमाणे १०० प्रश्नांचे एकूण २०० गुणांकरिता होणाऱ्या परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे गुणांकन तक्ता तयार करण्यात आला असून. प्रश्नपत्रिकेची संख्या – एक (प्रत्येक पदासाठी) एकूण गुण -२०० असणार आहे. तसेच नियम २ (५)(३) नुसार अग्निशमन-विमोचन / फायरमन या पदाकरिता परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ६० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (एकुण गुण १२०) परीक्षेसाठी एकत्रितपणे ७५ मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच ८० गुणांची व्यावसायिक चाचणी (शारीरिक पडताळणी) असेल, याबाबत स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करणेत येईल.

शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब
(अराजपत्रित) गट-क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत सूचित केले आहे. शासन निर्णय  नुसार शासनाने TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविताना प्रति उमेदवार आकारावयाचे परीक्षा शुल्क निश्चित केले आहे. तथापि, पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील टप्पा क्र. १ मधील रिक्त ४४८ पदे भरणेची संपूर्ण प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत राबविण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील
टप्पा क्र. २ मधील रिक्त ३२० पदे IBPS संस्थेमार्फत भरणे उचित ठरेल. सदर पदभरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने खुला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. १०००/- व मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. ९००/- परीक्षेचे प्रवेशशुल्क निश्चित करण्यात आले आहे. सदरचे प्रवेशशुल्क हे ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असून, बँक ऑफ महाराष्ट्र, पी.एम.सी शाखा, (१४३०), शिवाजीनगर, पुणे येथील खाते क्रमांक ६००३९६३६६४७ वर जमा करण्यात येणार आहे.
ही आहे वेबसाईट