राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत डॉ वसंत गावडे व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान तसेच “ओळख राष्ट्रीय सेवा योजनेची” या विषयावरील डॉ वसंत गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे व कार्यक्रमाधिकारी डॉ. अमोल बिबे यांनी दिली.
सदर कार्यक्रमामध्ये डॉ. वसंत गावडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत व्यक्त केले.
तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास तसेच महाविद्यालय आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारी मूल्य युवकांमध्ये रुजवली जातात असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. एस एफ ढाकणे, डॉ. व्ही एम शिंदे, डॉ. के डी सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल बिबे यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी तर आभार प्रदर्शन भूषण वायकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अजय कवाडे, डॉ. रमाकांत कसपटे, डॉ. अनिल लोंढे, डॉ. नंदकिशोर उगले यांनी विशेष परिश्रम घेतले.