Raksha Bandhan With Parvati Police| समाज रक्षणासह महिलांच्या संरक्षणासाठी ‘त्यांनी ‘ दिले वचन ! | पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन !

Raksha Bandhan with parvati police

HomeBreaking News

Raksha Bandhan With Parvati Police| समाज रक्षणासह महिलांच्या संरक्षणासाठी ‘त्यांनी ‘ दिले वचन ! | पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन !

Ganesh Kumar Mule Aug 19, 2024 7:43 PM

Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!
Pune Congress | निष्ठावंतांना संधी द्या | काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक | पर्वती मतदारसंघाच्या बैठकीत आबा बागुल यांच्यासाठी निर्धार
Aba Bagul Parvati | ‘पर्वती फर्स्ट’ मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट! | एकत्र येऊ,आपले प्रश्न आपणच सोडवू: आबा बागुल

Raksha Bandhan With Parvati Police| समाज रक्षणासह महिलांच्या संरक्षणासाठी ‘त्यांनी ‘ दिले वचन ! | पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन !

 

Aba Bagul Pune – (The karbhari news Service) – आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहू, असे वचन पर्वती पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भगिनींना दिले.

समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलॆल्या पोलीसबांधवाना कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर  आबा बागुल यांच्या पुढाकाराने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा स्व . राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल नांदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार कांबळे, सदाशिव कोपनर, पोलीस अंमलदार अनिरुद्ध अणेराव, पोलीस हवालदार सय्यद, महिला पोलीस शिपाई सपकाळ, स्व . राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या प्रा. रुपाली कदम, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, हेमंत बागुल यांच्यासह पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0