Rajni Tribhuvan Former Mayor Pune  | सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन!

HomeBreaking Newsपुणे

Rajni Tribhuvan Former Mayor Pune | सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन!

गणेश मुळे May 15, 2024 1:04 PM

Ghanshyam Nimhan | मिळकतकराबाबत आतातरी शहाणे व्हा! | काँग्रेस सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा सरकारला सल्ला
Mallikarjun Kharge | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संसदेच्या प्रवेशद्वारी भाजपच्या खासदारांकडून धक्काबुक्की | भाजपचा निषेध -माजी आमदार मोहन जोशी
Pune Congress Agitation | भाजप प्रेरित मनुस्मृतीचे राज्य कधीही काँग्रेस येऊ देणार नाही – अरविंद शिंदे

Rajni Tribhuvan Former  Mayor Pune | सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन!

Rajni Tribhuvan Passes Away – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन (Former Mayor of Pune Rajni Tribhuvan) यांचं आज सकाळी निधन झालं. सर्वांना आदराने वागवत ताई, दादा अशी हाक मारणाऱ्या, मनमिळाऊ अशी त्यांची ओळख होती. शिपाई पासून ते अधिकारी, राजकीय पदाधिकारी अशा सर्वांनीच त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे. (Rajni Tribhuvan Passes Away)
रजनी त्रिभुवन यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या.

आज सकाळी त्यांच्या भावाचं निधन झालं होतं म्हणून त्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. रडल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेनं मात्र पूर्ण शहरातून दुःख व्यक्त केले जात आहे. (Pune Municipal Corporation Mayor)

2005-2007 कालावधीत महापौर

रजनी त्रिभुवन या 2005 ते 2007 दरम्यान पुणे शहराच्या महापौर होत्या. 18 फेब्रुवारी 2005 ला त्या महापौर झाल्या होत्या. पुढे पंचवार्षिक संपेपर्यंत त्यांनी महापौर म्हणून काम केले. ताडीवाला रोड प्रभागातून त्रिभुवन या दोन वेळा नगरसेविका झाल्या होत्या. 2002 ते 2007 आणि 2007 ते 2012 असा त्यांचा महापालिका सदस्य पदाचा कालावधी राहिला. झोपडपट्टीतून येणाऱ्या आणि मागासवर्गीय म्हणून त्या पहिल्या महिला महापौर होत्या. रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

The Karbhari- Rajni Tribhuvan

पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागात महापौर पदाची असलेली नोंद

– ताडीवाला रोड परिसरातून नगरसेविका

रजनी त्रिभुवन  यांनी पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसवण्याचे काम केले होते. तसेच ताडीवाला रोड प्रभागात त्यांनी पुणे शहरातील पहिला रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा बसवला होता. त्या महापौर त्यांचे पती हे रेल्वेत कामाला होते. घरी महापौर असला तरी ते कामाला जात राहिले. एवढी साधी राहणी त्यांच्या पतीची होती. तसेच माजी महापौर देखील सर्वाशी प्रेमाने वागत असायच्या.

– सोनिया गांधी यांनी घरी दिली होती भेट

काँग्रेसमध्ये सुरेश कलमाडी गटाच्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या. त्या जेव्हा महापौर होत्या तेव्हा सोनिया गांधी यांचा पुणे दौरा झाला होता. त्यावेळी गांधी यांनी रजनी त्रिभुवन यांच्या घरी भेट दिली होती. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं.

त्यांच्या आठवणी सांगताना काही महापालिका कर्मचाऱ्यांना गहिवरून आलं. काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं कि त्या लहान मोठा असा भेद करत नसत. सर्वांना ताई दादा म्हणून हाक मारत असत. साधी राहणी असलेल्या महापौर गेल्याने सर्वांनीच दुःख व्यक्त केले.

– महापालिकेला 1 तास अगोदर सुट्टी

दरम्यान रजनी त्रिभुवन यांच्या निधना निमित्त दुखवटा व्यक्त करण्यासाठी आज पुणे महापालिकेच्या कार्यालयांना 1 तास अगोदरच म्हणजे 5:15 ते 6:15 या कालावधीत सुट्टी देण्यात आली.

The Karbhari- PMC Circular

पुणे महापालिकेला 1 तासाची सुट्टी देण्यात आली.