राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख
: भाजपकडून खुलासा
पुणे : गेले दोन दिवस पुणे शहरातील विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये पुणे शहर भाजपच्या निवडणूक संचालन समिती प्रमुख पदाच्या नियुक्ती बाबत वृत्त प्रसारित झाले आहे. यापैकी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत भाजपने खुलासा केला आहे.
त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीसराजेश पांडे यांना पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती पत्र दिले आहे. राजेश पांडे हे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून काम पाहातील.
भाजपने नुकतीच घोषणा केली होती कि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका निवडणुका लढल्या जातील. त्या अगोदर भाजपने घोषणा केली होती कि महापालिका निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे राहतील. यामुळे भाजप मधेच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता भाजपला हा खुलासा करावा लागला आहे.
COMMENTS